Indian Crickter Murali Vijay Announcement
Indian Crickter Murali Vijay Announcement Saamtv
क्रीडा | IPL

Murali Vijay: मुरली विजयचा क्रिकेटला रामराम! सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

Gangappa Pujari

Murali Vijay Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर करत त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. (Cricket News)

मुरली विजयने सोशल मीडियावर लिहलेल्या या पत्रामध्ये त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल चाहत्यांचे तसेच बीसीसीआयचे आभार मानले आहेत. ३८ वर्षाचा मुरली विजय त्याच्या स्टाईलिश फलंदाजीसाठी ओळखला जायचा. मात्र गेल्या किती पाच वर्षांपासून मुरली विजय संघात नव्हता.

मुरली विजयने भारतासाठी 61 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या 3982 धावा आहेत. यामध्ये त्याने 12 शतके आणि 15 अर्धशतकांसह 38.28 च्या सरासरीने धावा केल्या. मुरली विजयने भारतासाठी 17 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामनेही खेळले आहेत.

दरम्यान, मुरली विजयने 2008 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते, तर 2018 मध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 38 वर्षीय मुरली विजयची टीम इंडियाच्या स्टायलिश सलामीवीरांमध्ये गणना होते. आयपीएलमध्ये मुरली विजय चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत होता. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाचे नेतृत्वही केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि अटी

SCROLL FOR NEXT