Kapil Dev Saamtv
Sports

Kapil Dev Birthday: खरंच की काय! संपूर्ण कारकिर्दित एकही नो बॉल नाही; कपिलदेव यांच्याबद्दलचा दावा खरा की खोटा?

अनेक विश्वविक्रम करणाऱ्या कपिलदेव यांनी त्यांच्या संपुर्ण कारकिर्दित एकही नो बॉल टाकला नाही, असे अनेकदा सांगितले जाते.

Gangappa Pujari

Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघातील महान खेळाडू म्हणून कपिलदेव यांचे नाव घेतले जाते. आपल्या अष्टपैलू खेळीने क्रिकेट विश्वात नवनवीन विक्रम नावावर करणाऱ्या कपिलदेव यांची कारकिर्द १९७८ मध्ये सुरू झाली होती. कपिलदेव यांच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ चा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता.

आज ( 6 जानेवारी, ) कपिलदेव यांचा वाढदिवस. अनेक विश्वविक्रम करणाऱ्या कपिलदेव यांनी त्यांच्या संपुर्ण कारकिर्दित एकही नो बॉल टाकला नाही, असे अनेकदा सांगितले जाते. काय आहे यामागचे नेमके सत्य, चला जाणून घेवू. (Kapil Dev Birthday)

पहिला विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम असो किंवा आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना सतावणे असो कपिलदेव यांच्या नावावर क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंद आहेत. त्यामुळेच भारतीय क्रिकेटचे हिरो (Indian Cricket) म्हणून त्यांना ओळखले जाते. मात्र कपिलदेव यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दित एकही नो बॉल टाकला नाही, असाही दावा केला जातो. मात्र हा दावा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

इंटरनेटवर सर्च केले असता कपिलदेव यांनी १९९४ मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नो बॉल टाकला होता. इतकेच नव्हेतर युट्यूबवरील व्हिडिओंनुसार कपिल देव यांनी अनेकदा नो बॉल टाकले आहेत. त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला चेंडूही नो बॉल टाकल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर मिळतो. त्यामुळेच कपिलदेव यांनी कधीही नो बॉल न टाकल्याचा दावा सपशेल खोटा आहे.

दरम्यान, कपिल देव यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 434 कसोटी आणि 253 एकदिवसीय विकेट्स घेतल्या आहेत. तर फलंदाजी करताना कसोटी सामन्यात 5248 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 3783 धावा केल्या आहेत. त्यांच्या याच कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार (1980), पद्मश्री (1982) आणि पद्मभूषण (1991) मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

SCROLL FOR NEXT