harbhajan singh twitter
Sports

Manmohan Singh Death: देशाने दुरदर्शी नेता गमावला...दिग्गज खेळाडूंनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

Cricketers Reaction On Cricketers Death: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. दरम्यान त्यांच्या निधनानंतर दिग्गज खेळाडूंनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Ankush Dhavre

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. अखिल भारतीय चिकिस्ता संस्थान ( AIIMS) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. २००४ मध्ये ते देशाचे १३ वे पंतप्रधान होते. २०१४ पर्यंत त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सांभाळला. त्यांच्या निधनानंतर, राजकीय, क्रीडा, बॉलिवूड आणि सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला गेला आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वयामुळे मनमोहन सिंग यांची प्रकृती अस्थिर झाली होती. २६ डिसेंबरला ते अचानक बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ४० मिनिटं त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

क्रीडा विश्वातून व्यक्त केला गेला शोक

मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर दिग्गज खेळाडूंनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत, श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचे माजी खेळाडू हरभजन सिंगने पोस्ट शेअर करत लिहिले, ' भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अचानक जाण्याने मी खुप दुखी आहे. ते खूप साधे आणि दुरदर्शी व्यक्ती होते.' तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने पोस्ट शेअर करत लिहिले की, 'भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मी श्रद्धांजली वाहतो... ओम शांती.'

यासह भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि वीवीएस लक्ष्मण यांनी देखील पोस्ट शेअर करत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देवाने त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना हे दु:ख पचवण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना युवराज सिंग आणि वीवीएस लक्ष्मण यांनी केली आहे. यासह भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेल आणि भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालने देखील पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT