Rishabh Pant And isha Negi saam tv
Sports

रिषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार; गर्लफ्रेंड झाली खूश, इन्स्टाग्रामवर शेअर केला जबरदस्त मेसेज

रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगीने सोशल मीडियावर स्पेशल मेसेज शेअर केला आहे.

नरेश शेंडे

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पाच टी-२० सामन्यांच्या (India vs south Africa T-20) सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला टी-२० सामना आज सायंकाळी होणार आहे. पहिल्यांदाज टी-२० क्रिकेट मध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या रिषभ पंतकडे (Rishabh Pant) संपूर्ण भारतीयांच्या नजरा वळल्या आहेत. आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा रिषभ आता दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणार का, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

रिषभ पंतची गर्लफ्रेंड झाली खूश

के एल राहुलला दुखापत झाल्याने तो सीरिजमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारताचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज रिषभ पंतला कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. रिषभसाठी ही आनंदाची बातमी तर आहेच पण, त्याची गर्लफ्रेंड इशा नेगीलाही आनंदाचा पारावार उरला नाहीये. इशाने रिषभसाठी सोशल मीडियावर एक खास मेसेज शेअर केला आहे.

Isha Negi

इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्पेशल स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत इशाने लिहिलंय की, तिला थॅंकफुल, ग्रेटफुल आणि ब्लेस्ड असल्यासारखं वाटत आहे. रिषभ पंतला दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० सीरिजसाठी बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित केलं. त्यानंतर इशाने एक स्टोरी पोस्ट करुन इन्स्टाग्रामवर आनंद व्यक्त केला आहे.

रिषभला नेतृत्वाची करण्याची संधी मिळाल्याने इशाने आभार मानले आहेत. तिने थॅंकफुल, ग्रेटफुल आणि ब्लेस्ड असं इन्स्टाग्रामच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. रिषभ पंत आणि इशा नेगी आधीपासूनच एकमेकांना डेट करत आहेत. इशा नेगी यंदाच्या आयपीएल २०२२ मध्येही दिल्ली कॅपिटल्सचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जात होती. तसंच सोशल मीडियावरही इशा नेहमीच सक्रिय असते.

दरम्यान, भारत - दक्षिण आफ्रिका सीरिज सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला. कारण, भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या के एल राहुलला तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला दुखापत झाल्याने दोघेही सीरिजमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे के एल राहुलच्या अनुपस्थित भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे रिषभवर आता आयपीएलचा फॉर्म देशासाठी दाखवण्याची वेळ आली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेसाठी टेम्बा बावुमा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT