Rishabh Pant Car Accident  Saam Tv
Sports

Rishabh Pant Accident: सर्वात मोठी बातमी! भीषण अपघातानंतर 17 दिवसांनी रिषभ पंतचे पहिले ट्विट, म्हणाला; 'जय शहा आणि....'

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. आता अपघातानंतर तब्बल १७ दिवसांनी त्याने पहिले ट्विट केले आहे.

Gangappa Pujari

Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतच्या भीषण अपघाताने क्रिडाविश्वात खळबळ माजली होती. शुक्रवार( ३०, डिसेंबर) दिल्लीहून डेहराडूनकडे जात असताना हा भीषण अपघात झाला होता. अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रिषभला काही दिवसांपूर्वीच त्याला मुंबईत आणण्यात आले होते. तसेच मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. अपघातानंतर तब्बल १७ दिवसांनी रिषभ पंतने सोशल मीडियावर त्याचे पहिले ट्विट केले आहे. (Rishabh Pant)

याबद्दल अधिक माहिती अशी की, भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतने अपघातानंतर पहिले ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांचे तसेच बीसीसीआयचेही आभार मानले आहेत.

काय म्हणाला रिषभ पंत:

"तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मी कृतज्ञ आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता यातून सावरण्याचा कालावधी सुरू झाला आहे. मी पुढील आव्हानांसाठी सज्ज आहे. बीसीसीआय (BCCI), जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांना अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद."

दरम्यान, या गंभीर अपघातात रिषभ पंतच्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा त्याने केला होता. रिषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रिडा जगतात त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

अपघातानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला सहा ते सात आठवडे आराम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच त्याला आगामी विश्वचषकालाही मुकावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: PM नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यात खास ड्रोन शो

Daily Horoscope: गोड बातमी मिळणार की ब्रेकअप होणार; प्रेमी जोडप्यांसाठी कसा असेल बुधवारचा दिवस?

IAS Transfer : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश; राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune News: बुधवार पेठेत गेला अन् हौस केली, नंतर पेमेंट अ‍ॅपचा पासवर्डच विसरला; ३ वेश्यांनी चांगलाच तुडवला

Wednesday Horoscope : व्यवहाराला गती, देवाणघेवाण टाळा; बुधवारचा दिवस १२ राशींसाठी कसा असणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT