Indian cricket team saam tv
Sports

भारताचा T-20 मालिकेवर कब्जा, आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव, किलर मिलरची शतकी खेळी व्यर्थ

आफ्रिकेच्या सलामीवीर फलंदाजांची सुरुवात खराब झाली, कारण...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून गुवाहाटीत आज दुसरा सामना रंगला. पहिल्या इनिंगमध्ये भारताने तीन विकेट्स गमावून 20 षटकात 237 धावा कुटल्या. त्यानंतर मैदानात लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या सलामीवीर फलंदाजांची सुरुवात खराब झाली. भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात आफ्रिकेच्या दोन फंलदाजांना बाद केलं.

अर्शदिपने टेम्बा बाऊमाला आणि रिली रासोव्हला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर मार्करम, मिलर आणि डिकॉकने भारतीय गोलंदाजीवर आक्रमक खेळी करून धावांचा पाऊस पाडला. डेव्हिड मिलरने तुफान फटेबाजी करत शतकी खेळी केली. परंतु आफ्रिकेच्या फलंदाजांनना लक्ष्य गाठण्यात अपयश आलं. त्यामुळे भारताचा आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातही दणदणीत विजय झाला. भारताने २-० ने आघाडी घेतल्याने मालिका जिंकली.

आफ्रिकेचा संघ दबावात असतानाही एडिन माक्ररमने आक्रमक खेळी केली. त्याने 19 चेंडूत 33 धावांची खेळी साकारली. परंतु, भारताचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला फिरकीपटू अक्षर पटेलने माक्ररमला बाद केलं. मात्र, त्यानंतर डेव्हिड मिलरने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. तसेच क्विंटन डिकॉकनेही आफ्रिकेच्या धावांचा आलेख चढता ठेवला. डेव्हिड मिलरने 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. तर डिकॉकने 48 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी केली.

अन् मैदानात आला साप....

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसाने नाही तर चक्क सापाने सामना थांबवला. सातव्या षटकानंतर सामना काही वेळ थांबवावा लागला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली होती. मात्र, सापाने मैदानात धाव घेतल्याने धावांचा पाऊस थांबला. सामना थांबला त्यावेळी सात षटके पूर्ण झाली होती आणि भारताने बिनबाद 68 धावा केल्या होत्या.

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुलने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. पहिल्या दहा षटकात 96 धावांचा पाऊस पाडल्यानंतर आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजने रोहितला बाद करून ब्रेक थ्रू दिला. त्यानंतर राहुलने आक्रमक खेळी करून अर्धशतक ठोकलं. पण या इनिंगमध्ये पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आणि त्याच्यासोबत विराटनेही आफ्रिकी गोलंदाजांचा समाचार घेतला. यादवने आफ्रिकन गोलंदाजांचा धुव्वा उडवत 22 चेंडूत 61 धावा कुटल्या. तर विराटने 28 चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकही 7 चेंडूत 17 धावा करून नाबाद राहिला.

भारताचे आक्रमक फलंदाज रोहित शर्मा आणि के एल राहुलने पहिल्या तीन षटकात सावधपणे फलंदाजी करून २१ धावा केल्या. पण त्यानंतरच्या तीन षटकात दोघांनाही चौफेर फटकेबाजी करून टीम इंडियाला सहा षटकात बिनबाद 57 धावांवर पोहोचवले. कर्णधार रोहित शर्मा महाराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहितने 37 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानंतर राहुलने त्याच्या आक्रमक शैलीत षटकार मारून टी-२० क्रिकेटमधील २० वा अर्धशतक ठोकलं. परंतु, महाराजने राहुलला एलबीडब्लू करत बाद केलं. राहुलने २८ चेंडूत ५७ धावा कुटल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT