नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया 16 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्डकपची (T20 world cup) रणधुमाळी सुरू होणार आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियाची सराव सामन्यांतून जोरदार तयारी सुरू आहे. पण, अजूनही टीम इंडियाला काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाला (Indian cricket team) फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असं मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघाप्रमाणे टीम इंडियानेही त्यांच्या कौशल्यात जास्तीत जास्त वाढ केली पाहिजे, असंही शास्त्री म्हणाले. (Team India former coach ravi shastri gives big suggestion)
फिल्डिंगच्या माध्यमातून धावा रोखल्यावर त्याचा रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला जबरदस्त फायदा होईल. टीम इंडियाला विरोधी संघाला रोखण्यासाठी सुरवातीपासूनच फिल्डिंगकडे जास्त लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. पाकिस्तानच्या संघाचा पराभव करण्यासाठी टीम इंडियाला अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि त्यांना ए गेमला मैदानात आणावं लागेल. उत्तम क्षेत्ररक्षण केल्यावर 15-20 धावांची बचत तुमच्या संघाला विजयाच्या दिशेनं नेऊ शकते.
कारण, जर तुम्ही फलंदाजीमध्ये सुमार कामगिरी केली तर 15-20 धावांचा फटका बसतो. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका संघाची फिल्डिंग कौतुकास्पद असते. श्रीलंकाने आशिया कपमध्ये अप्रतिम फिल्डिंग केली, याकडे आपण पाहू शकतो. फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला.
शास्त्रींनी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरबाबतही भाष्य केलं. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याच्या आक्रमक फलंदाजीमुळं टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर फंलंदाजांना थोडासा दिलासा मिळतो. मी मागील सहा-सात वर्षांपासून टीम इंडियाच्या सिस्टमध्ये होतो. मी याआधी प्रशिक्षक म्हणून होतो आणि आता मी बाहेरून लक्ष ठेवत आहे.
टीम इंडियाची टी20 मधील सध्याची लाईन अप आधीच्या तुलनेत चांगली आहे. नंबर चारवर सूर्यकुमार यादव, पाच नंबरवर हार्दिक पंड्या आणि सहाव्या स्थानावर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक, यामुळं टीम इंडियाची मजबूती अधिक वाढते. विशेषत: या खेळाडूंमुळं टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला त्यांच्या स्टाईलने फलंदाजी करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.