Indian Cricket Team
Indian Cricket Team saam tv
क्रीडा | IPL

'सूर्या' पुन्हा तळपला! राहुलचं धडाकेबाज अर्धशतक, 'विराट' खेळीमुळं आफ्रिकेला 238 धावांंचं आव्हान

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु झाली असून आज गुवाहाटीत दुसरा सामना होत आहे. टीम इंडियाने पहिला सामना ८ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मैदानात उतरलेले भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुलने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. पहिल्या दहा षटकात 96 धावांचा पाऊस पाडल्यानंतर आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजने रोहितला बाद करून ब्रेक थ्रू दिला. त्यानंतर राहुलने आक्रमक खेळी करून अर्धशतक ठोकलं. पण या इनिंगमध्ये पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आणि त्याच्यासोबत विराटनेही आफ्रिकी गोलंदाजांचा समाचार घेतला. यादवने आफ्रिकन गोलंदाजांचा धुव्वा उडवत 22 चेंडूत 61 धावा कुटल्या. तर विराटने 28 चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकही 7 चेंडूत 17 धावा करून नाबाद राहिला.

भारताचे आक्रमक फलंदाज रोहित शर्मा आणि के एल राहुलने पहिल्या तीन षटकात सावधपणे फलंदाजी करून २१ धावा केल्या. पण त्यानंतरच्या तीन षटकात दोघांनाही चौफेर फटकेबाजी करून टीम इंडियाला सहा षटकात बिनबाद 57 धावांवर पोहोचवले. कर्णधार रोहित शर्मा महाराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहितने 37 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानंतर राहुलने त्याच्या आक्रमक शैलीत षटकार मारून टी-२० क्रिकेटमधील २० वा अर्धशतक ठोकलं. परंतु, महाराजने राहुलला एलबीडब्लू करत बाद केलं. राहुलने २८ चेंडूत ५७ धावा कुटल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु झाली असून आज दुसरा सामना होत आहे. टीम इंडियाने पहिला सामना ८ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारत आज दुसरा सामनाही जिंकल्यास मालिकेवर विजयाची मोहोर उमटवून २-० ने आघाडी घेईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT