IND vs WI 4th ​​T20I Saam Tv
Sports

भारताने वेस्ट इंडिजचा ५९ धावांनी केला पराभव; मालिकाही घातली खिशात

भारतीय संघाने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या T20 सामन्यात ५९ धावांनी विजय मिळवला.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : भारतीय संघाने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs WI) मालिकेतील चौथ्या T20 सामन्यात (IND vs WI 4th ​​T20I) ५९ धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे भारताने ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. फ्लोरिडामध्ये पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने (Team India) निर्धारित 20 षटकात ५ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. विंडीज संघाचे फलंदाजांनी चांगली खेळी केली नाही. विडींजचा डाव त्यांचा डाव १९.१ षटकांत १३२ धावा केल्या. मालिकेतील ५वा आणि शेवटचा सामना आज रविवारी ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. त्याने ३१ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार ठोकले. कर्णधार रोहित शर्माने १६ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३३ धावांची शानदार खेळी केली. संजू सॅमसन २३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत ३० धावांवर नाबाद परतला.

भारतीय युवा गोलंदाजांनी चांगली कामगीरी केली. युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने ४ षटकात केवळ १७ धावा देत २ बळी घेतले. आवेशला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अर्शदीप सिंगनेही अप्रतिम कामगिरी करत या युवा वेगवान गोलंदाजाने ३ बळी घेतले. अक्षर पटेलने अष्टपैलू खेळ दाखवला. त्याने २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ८ चेंडूत नाबाद २० धावा करण्यासोबतच २ बळी घेतले. फिरकीपटू रवी बिश्नोईनेही २ बळी घेतले.

वेस्ट इंडिजने सुरूवातीपासूनच चांगली खेळी केली नाही. आवेश खानने सुरुवातीच्या षटकांमध्ये ब्रेंडन किंग (१३) आणि डेव्हॉन थॉमस (१) यांना बाद केले. त्यानंतर कर्णधार निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी चांगली खेळी केली. ८ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २४ धावा करणारा पूरन धावबाद झाला, तर १६ चेंडूत २४ धावा करणारा पॉवेल पत्राचा दुसरा बळी ठरला. १४ धावा करून काइल मायर्स अक्षर पटेलचा बळी ठरला.

डावाच्या ९ व्या षटकात अर्धा संघ बाद झाला. वेस्ट इंडिजला जेसन होल्डर (१३) आणि शिमरॉन हेटमायर (१९) या दोघांनीही निराशा केली. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सूर्यकुमार यादवसोबत ५३ धावांची सलामी दिली. पहिल्या दोन षटकांत चौकार मारल्यानंतर रोहितने तिसर्‍याच षटकात ओबेद मॅकॉय (६६ धावांत २) षटकार ठोकले. या षटकात सूर्यकुमारने एक षटकार आणि एक चौकारही लगावला. या षटकात भारतीय संघाने २५ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT