Ravi Shashtri
Ravi Shashtri saam tv
क्रीडा | IPL

T-20 बंदच करा, फक्त विश्वचषक स्पर्धा खेळवा, रवी शास्त्री म्हणाले...

नरेश शेंडे

मुंबई : आयपीएलच्या १५ पर्वाची नुकतीच सांगता झाली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) खेळाडू आगमी होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका टी -२० सीरिजसाठी कंबर कसत आहेत. मात्र, ही सीरिज सुरु होण्यापू्र्वीच एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi shastri) यांनी टी-२० सीरिजबाबत मोठं विधान केलं आहे. दोन संघांमध्ये टी-२० सीरिजचे सामने करण्यापेक्षा थेट विश्वचषकात (World cup) सामने खेळणे अधिक चांगलं आहे. टी-२० क्रिकेट (T-20 cricket) फुटबॉलच्या खेळासारखं असलं पाहिजे, जीथे तुम्ही फक्त विश्वचषक खेळता. द्विपक्षीय टुर्नामेंट कुणाच्याही लक्षात राहत नाही. असं रवी शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी-२० सामन्यांची सीरिज भारतात ९ जूनपासून सुरु होणार आहे. या सीरिजबाबत रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिलीय. माध्यमांशी बोलताना शास्त्री म्हणाले, टी-२० क्रिकेटमध्ये खूपच द्विपक्षीय क्रिकेट होत आहे. हे मी यापूर्वीही म्हटलं होतं. जेव्हा मी भारतीय क्रिकट टीमचा कोच होतो तेव्हाही मी याबाबत टीप्पणी केली होती. हा टी-२० क्रिकेटचा खेळ फुटबॉलसारखा असला पाहिजे. जीथे फक्त विश्वचषक खेळलं जातं. द्विपक्षीय टुर्नामेंटला कुणीही लक्षात ठेवत नाही. जगभरात फ्रॅंचायजी क्रिकेट खेळला जातो.प्रत्येक देशाला फ्रॅंचायजी क्रिकेट खेळण्याची अनुमती आहे. जे घरेलू क्रिकेट आहे, ते खेळलं जातं आणि त्यानंतर दोन वर्षांनी एक विश्वचषक खेळला जातो.

रवी शास्त्री पुढे म्हणाले, भविष्यात १४० सामन्यांना दोन सत्रांमध्ये ७०-७० मध्ये विभागलं जाऊ शकतं. तुम्ही काहीही बोलू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल की, हे याचं प्रमाण सर्वाधीक आहे, पण भारतात याचा ओवरडोज नाही आहे. मी बायो-बबलच्या बाहेर लोकांना पाहिलं आहे. दरम्यान, आयपीएलच्या भविष्याबाबत आकाश चोप्रा यांनी म्हटलं की, मला वाटतंय की, भविष्यात प्रत्येक कॅलेंडर वर्षात आयपीएलचे दोन विभाग होऊ शकतात आणि हे लवकरच होण्याची शक्यता आहे. चोप्रा यांच्या दिलेल्या प्रतिक्रियेला शास्त्री यांनी दुजोरा दिला. हे भविष्य आहे, असं शास्त्री यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जिथे झोपडी, तिथेच घर हवं हे बाळासाहेबांचं स्वप्न; उद्धव ठाकरे

Raj Thackeray: महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरु केलं, राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात

RCB vs DC: पाटीदारचं दमदार अर्धशतक; RCBनं दिल्लीसमोर ठेवलं १८८ धावांचे लक्ष्य

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पुन्हा लाव रे तो व्हिडिओ; सुषमा अंधारेंचा तो व्हिडिओ चालवत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray: बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तोवर विकास होणार नाही, परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक

SCROLL FOR NEXT