Bishan Singh Bedi ANI
क्रीडा

Bishan Singh Bedi: भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन

Bishan Singh Bedi : महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे ७७ व्या वर्षी निधन झाले.

Bharat Jadhav

Bishan Singh Bedi Passes Away:

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचे सासरे महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे ७७ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. बेदी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि बॉलीवूड अभिनेता अंगद बेदी आहे, ज्याचे लग्न अभिनेत्री नेहा धुपियाशी झाले आहे.(Latest News)

बेदी यांनी आपल्या कसोटी करिअरमध्ये सरासरी २८.३१ ने २६६ विकेट घेतल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या एकदिवशीय क्रिकेटच्या करिअरमध्ये ७ विकेट घेतल्या आहेत. बेदी हे आतापर्यंत भारताचे सर्वात यशस्वी डावखुरे फिरकी गोलंदाज होते. यावर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलमध्ये रवींद्र जडेजाने बेदी यांचा विक्रम मोडलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिशन बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ मध्ये अमृतसर येथे झाला होता. बेदी हे डावखुरे फिरकीपटू होते. ते त्यांच्या गोलंदाजीच्या स्कीलमुळे लोकप्रिय झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये १९६६ पदार्पण केलं होतं. त्यांनी १९७९ पर्यंत देशांचे प्रतिनिधीत्व केलं. बिशन सिंग बेदी हे आपल्या फिरकीने फलंदाजांना जाळ्यात फसवत. आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीमुळे ते फलंदाजांची विकेट घेत असतं. १९७१ मध्ये बांगलादेशविरुद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

जखमी अजित वाडेकर यांच्या अनुपस्थितीत ते संघाचे कर्णधार राहत असायचे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक स्पर्धात्मक क्रिकेट राष्ट्र म्हणून प्रतिष्ठा निर्माण केली होती. बिशन सिंग बेद यांचे आंतराष्ट्रीय करिअरसोबत स्थानिक क्रिकेटमध्येही करिअर राहिले आहे. त्यांनी दिल्लीच्या संघाचे मेंटॉरची भूमिका निभावली होती. भारतातील असंख्य फिरकीपटूंना त्यांनी गोलंदाजीचे धडे दिलेत. बेदी यांनी क्रिकेट समालोचनही केले होते. निवृत्तीनंतर ते क्रिकेटवर विविध विषयांवर आपले मत मांडत असायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT