rohit sharma in press conference saam tv
Sports

Rohit Sharma Statement: असले प्रश्न अजिबात विचारू नका, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्मा भडकला, Video

Rohit Sharma Gets Angry In Press Conference: पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma On World Cup 2023:

आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार रोहित शर्मा पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पत्रकाराने रोहित शर्माला प्रश्न विचारला होता. ज्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, ' वर्ल्डकप च्या वेळी मला हा प्रश्न विचारू नका. जेव्हा भारतात पत्रकार परिषद होईल तेव्हा आम्हाला जर तरचे प्रश्न विचारू नका. कारण आम्ही या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. आमचं लक्ष वेगळं आहे. आम्ही त्यावर काम करतोय.'

आगामी वर्ल्डकप स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाचे उपकर्णधारपद भूषवताना दिसून येणार आहे. हार्दिक पंड्या बद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ' तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गेल्या एक दीड वर्षात त्याने गोलंदाजीत सातत्य ठेवलं आहे. तो फलंदाजीत देखील चांगली कामगिरी करू शकतो. गेल्या सामन्यात त्याने दाखवून दिलं की, तो शांत आणि नियंत्रित आहे. संघाला गरज असताना तो मोठी खेळी देखील करू शकतो आणि संघाला जशी गरज असेल त्याचा अंदाज घेऊन तो फलंदाजी करतो. (Latest sports updates)

यंदाचा वर्ल्डकप जिंकणार का? या प्रश्नावर कर्णधार रोहित शर्माने उत्तर देत म्हटले की, ' आम्ही आमच्यावर कुठलाच दबाव येऊ देणार नाही. आम्ही जाऊन फक्त आमचं बेस्ट देणार आहोत.' भारतीय संघाने २०११ मध्ये शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. आता यावेळी देखील वर्ल्डकप भारतात होत आहे. त्यामुळे भारतीय संघाला तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी असणार आहे.

आगामी वनडे वर्ल्डकपासाठी असा आहे भारतीय संघ (Team India World Cup)

रोहित शर्मा( कर्णधार), शुबमन गिल,विराट कोहली ,श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT