Indian High Commission On Imran Khan Arrest : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांना अटक होताच देशात दंगे व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशात विरोध, प्रदर्शन आणि हिंसाचार सुरु आहे. काही भारतीय खेळाडू देखील पाकिस्तानात असल्याची माहिती मिळाली आहे.
लाहोर ब्रिज टूर्नामेंटमध्ये सहभाग घेतलेल्या भारतीय खेळाडूंना आता पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या पाकिस्तानात एशियन आणि मिडल ईस्ट ब्रिज टूर्नामेंट सुरु आहे. या स्पर्धेत एकूण ३२ भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ५ मे रोजी सुरु झालेली ही स्पर्धा १३ मे पर्यंत सुरु राहणार आहे. भारतीय खेळाडूंनी वाघा बॉर्डरमधून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांना लाहोरमधून भारतात परतण्याचे आदेश दिले आहे.
पाकिस्तानची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली..
पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत विकट झाली आहे. पाकिस्तानची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांना अटक होताच पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार करायला सुरुवात केली आहे. या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही गोळीबार केला आहे. मात्र आंदोलक थेट पोलिसांवर बॉम्ब करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती पाहता भारतीय खेळाडूंना तातडीने भारतात परतण्याचे आदेश दिले गेले आहेत. (Latest sports updates)
ब्रिज टूर्नामेंटचं काय?
या स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. पाकिस्तानची सद्यस्थिती पाहता ही स्पर्धा थांवण्याशिवाय दुसरा पर्याय दिसून येत नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.