virat kohli saam tv
Sports

Ishant Sharma Statement: 'विराट धोनीमुळेच सक्सेसफुल कॅप्टन बनला..', दिग्गज खेळाडूने गायले कॅप्टन कुलचे गोडवे

Ishant Sharma On Dhoni: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने एमएस धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Ishant Sharma Latest News In Marathi:

विराट कोहली हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. तसेच कर्णधार म्हणूनही त्याने संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने केवळ भारतात नव्हे तर परदेशात जाऊनही मालिका जिंकल्या आहेत.

विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय गोलंदाज कुठल्याही खेळपट्टीवर २० विकेट्स घेऊन सामना जिंकून द्यायचे. आता याबाबत बोलताना भारतीय संघातील वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने एमएस धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

ईशांतने OTT प्लॅटफॉर्मवर बोलताना म्हटले की,'तो सर्वश्रेष्ठ होता. जेव्हा विराट कोहली आमचा कर्णधार होता त्यावेळी आमचं पूर्णपणे तयार होतं. हेच माही भाईच्या (एमएम धोनीच्या) नेतृत्वाखाली खेळताना संघबांधणी सुरू होती. त्यावेळी शमी आणि उमेश नवीन होता आणि मीच होतो तिथे. इतर गोलंदाज बदलत होते. भुवी देखील नवीन होता. माही भाई ज्या पद्धतीने समजवायचा त्याला तोड नाही. त्याने गोलंदाजांना तयार केलं आणि संघाची साथ सोडली. '

तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत बोलताना तो म्हणाला की, 'पहिली गोष्ट म्हणजे तो आक्रमकप होता. जर तुम्ही नव्या चेंडूने गोलंदाजी करत असाल तर तुम्ही ५ षटकात २५ धावा देऊ शकतात. मोबदल्यात तुम्ही २ विकेट्स घ्या. त्याची भूमिका स्पष्ट होती. तो मला म्हणायचा की, तुला बरेच सामने खेळण्याचा अनुभव आहे. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता तुला विकेट घेण्याचे मार्ग शोधावे लागतील.' (Latest sports updates)

तसेच शमीकडे जाऊन तो म्हणाला की, ' मला माहितेय की विकेट घेऊ शकतो. मला असं वाटतंय की तू सलग गोलंदाजी करावी आणि ३ निर्धाव षटक टाकावे.' जसप्रीत बुमराहला जाऊन तो म्हणाला होता की, 'हा तुझा पदार्पणाचा सामना आहे. तू जे करत आला आहेस तेच करायचं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्य असणं खुप गरजेचं आहे.२०२१ नंतर मला जाणवलं की, आम्ही काहीतरी हटके विचार करावा असं त्याचं मत होतं.' असं ईशांत शर्मा म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT