Charlie dean run out by deepti sharma saam tv
क्रीडा

भारत-इंग्लंड सामन्यातील रन आऊटच्या वादावर दिप्ती शर्माचं मोठं विधान, म्हणाली...

भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला, पण...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. मात्र, या सामन्याची क्रिकेट विश्वात तुफान चर्चा रंगली. विशेष म्हणजे भारताची दिग्गज आणि अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीचा (Jhulan Goswami) क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. या सामन्यात एका खेळाडूला धावबाद केल्यामुळं वादविवाद सुरु झाला.

दिप्ती शर्माने (Deepti Sharma) इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला नॉन स्ट्राईक एंडला धावबाद केलं होतं. त्यानंतर अनेकांनी धावबाद केल्याच्या या निर्णयाबाबत टीका-टीपण्णी सुरु केली. हा खेळ भावनांच्या विरुद्ध झाल्याने खूप लोकांनी नाराजीचा सूर धरला. मात्र, भारताच्या फिरकी गोलंदाजांनी या वादावर अखेर पडदा टाकला आहे. (Indian women's cricket team latest news update)

भारत आणि इंग्लंडच्या सामन्यात ४४ व्या षटकात इंग्लंडची फलंदाज चार्ली डीन क्रिज सोडून बाहेर गेली होती. त्याचेवेळी चेंडू फेकण्याच्या आधी दिप्तीने चार्लीला नॉन स्ट्राईक एंडला स्टम्पची बेल्स उडवून धावबाद केलं. त्यामुळे इंग्लंडचा पराभव झाला आणि एका नव्या वादाला सुरुवात झाली. हा भावनांच्या विरोधातील खेळ आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली.

हा आमचा प्लान होता

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट भूमिका मांडली. हा आमचा प्लान होता, असं दिप्तीनेही माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी दिप्ती म्हणाली, हा आमचा प्लान होता. चार्ली सतत क्रिज सोडून बाहेर जात होती. आम्ही तिला सूचनाही दिली होती. त्यामुळे नियमांना अनुसरून आम्ही असं केलं.

एमसीसीनं दिलं स्पष्टीकरण

धावबाद केल्यानंतर सुरु झालेल्या वादाबाबत बोलताना एमसीसीने म्हटलं होतं की, हा नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या फलंदाजांसाठी संकेत आहे. जो पर्यंत गोलंदाज चेंडू फेकत नाही, तोपर्यंत फलंदाजाने क्रिज सोडायचं नाही. भारत आणि इंग्लंडच्या तिसऱ्या सामन्यात फलंदाज धावबाद झाल्यामुळं सामन्याचा शेवट वेगळा झाला. पण दे झालं ते पूर्णपणे अधिकृत होतं आणि याबाबत कोणतीही वेगळी टीपण्णी करण्याची आवश्यकता नाहीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT