indian cricket team twitter/bcci
Sports

India vs Pakistan: पाकिस्तानला तर हरवलं, मात्र या कारणामुळे वाढलंय टीम इंडियाचं टेन्शन

IND vs PAK, ICC T20 World Cup 2024: भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील १९ व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या लो स्कोरिंग सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत विजयाचा गुलाल उधळला आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

मात्र भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ११९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला अवघ्या ११३ धावा करता आल्या. दरम्यान हा सामना जरी जिंकला असला तरीदेखील भारतीय फलंदाजांनी टेन्शन वाढवलं आहे.

विराट कोहली ठरला फ्लॉप

या सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली. मात्र विराट कोहली दुसऱ्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. तो २ चेंडूत अवघ्या अवघ्या ४ धावा करत तंबूत परतला.

सूर्याची बॅट शांतच

विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी होती. मात्र गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव ८ चेंडूंमध्ये ७ धावांची खेळी करत तंबूत परतला. भारतीय संघाकडून अक्षर पटेल आणि रिषभ पंतने संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

हार्दिक, जडेजा अन् दुबेही ठरला फ्लॉप

अवघ्या ८९ धावांवर भारतीय संघातील ४ फलंदाज माघारी परतले होते. इथून भारतीय संघ कमीत कमी १५० धावांपर्यंत मजल मारणार असं चित्र दिसत होतं. मात्र नेमकं त्याचवेळी भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. शिवम दुबे, रविंद्र जडेजा एकापाठोपाठ एक माघारी परतले. हार्दिक पंड्यावरही मोठी जबाबदारी होती. मात्र तो देखील अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. एकंदरीतच भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

SCROLL FOR NEXT