Team India - social media  saam tv
Sports

Team India T20 World cup : टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; कर्णधार कोण? कोणाला मिळाली संघात संधी?

india women t20 world cup 2026 squad harmanpreet captain : टी २० वर्ल्डकप २०२६ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने हरमनप्रीत कौर हिच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

Nandkumar Joshi

ICC Women's T20 World Cup 2026 : आयसीसी वुमेन्स टी २० वर्ल्डकप २०२६ या स्पर्धेसाठी आज, शनिवारी (२ मे २०२६) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर ही कर्णधार असेल. पुढील महिन्यात वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघानं वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळं बीसीसीआयनं पुन्हा एकदा विश्वास दाखवत तिच्याकडे संघाचे नेतृत्व दिले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ वनडेनंतर आता टी २० वर्ल्डकप जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेची सुरुवात १२ जूनपासून होणार आहे. ५ जुलै २०२६ रोजी फायनल होणार आहे. यावेळी टी २० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये करण्यात आले आहे.

बीसीसीआयने टी २० वर्ल्डकप स्पर्धा आणि त्यासोबतच इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन टी २० सामन्यांच्या मालिकेसाठीही संघाची निवड केली आहे. टी २० संघ वर्ल्डकपची तयारी म्हणून इंग्लंडविरुद्ध टी २० मालिका खेळणार आहे. त्यानंतर जूनमध्ये वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे.

यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर असेल. तर स्मृती मंधाना ही उपकर्णधार असेल. शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. ऋचा घोष ही विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात असेल. तर यास्तिका भाटिया ही पर्यायी विकेटकीपर म्हणून संघात असेल. भारती फुलमाळीलाही संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या गोलंदाजीला धार आणण्यासाठी रेणुका ठाकूर, क्रांती गौड आणि श्रेयंका पाटील यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर त्यांना राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्री चरणी यांची साथ असेल. १५ खेळाडूंच्या चमूव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला स्टँडबाय प्लेअर ठेवण्यात आले नाही.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे -

  • हरमनप्रीत कौर (कर्णधार)

  • स्मृती मंधाना (उपकर्णधार)

  • शेफाली वर्मा

  • जेमिमा रॉड्रिुक्स

  • भारती फुलमाळी

  • दिप्ती शर्मा

  • ऋचा घोष

  • श्री चरणी

  • यास्तिका भाटिया

  • नंदिनी शर्मा

  • अरुंधती रेड्डी

  • रेणुका ठाकूर

  • क्रांती गौड

  • श्रेयंका पाटील

  • राधा यादव

  • भारतीय संघाच्या गट - साखळी फेरीतील सर्व सामन्यांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.

  • १४ जून, रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान

  • एजबेस्टन, बर्मिंघम

  • १७ जून - भारत विरुद्ध नेदरलँड

  • हेडिंग्ले, लीड्स

  • २१ जून - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

  • ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

  • २५ जून - भारत विरुद्ध बांगलादेश

  • ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

  • २८ जून - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  • लॉर्ड्स, लंडन

  • भारतीय संघ हा ग्रुप १ मध्ये असेल. त्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड हे संघ असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापुरात संपत्तीच्या वादातून भावजयीसह मुला - मुलीची तलवारीने हत्या

परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

Health Care: उन्हाळ्यात खजूर खावे की नाही? काय होतात शरीराल फायदे?

Pune Tourism : पुण्याजवळील ऐतिहासिक रत्न, 'या' किल्ल्यावर सुरू झाला मराठा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा

Crime News: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; व्हिडिओ काढले, ब्लॅकमेल आणि टॉर्चर केलं, अखेर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT