India vs Pakistan Match in Commonwealth Games 2022 saam tv
क्रीडा

Commonwealth Games 2022 : भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय, स्मृती मानधनाची चौफेर फटकेबाजी

स्मृती मानधनाने विनिंग षटकार मारून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये पहिल्या विजयाची मोहोर उमटवून दिली.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारत आणि पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटचा सामना आज रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने (India) ८ गडी राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानच्या महिला संघाने भारतीय महिला संघाला १०० धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) चौफेर फटकेबाजीमुळं भारतीय संघाने पाकिस्तानवर (Pakistan) सहज मात केली. स्मृती मानधनाने विनिंग षटकार मारून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये पहिल्या विजयाची मोहोर उमटवून दिली.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामना १८ षटकांचा खेळवण्यात आला. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीमुळं पाकिस्तानच्या फलंदाजांनी ९९ धावांवर नांगी टाकली. त्यानंतर १०० धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने १२ व्या षटकात अवघ्या दोन विकेट्स गमावत सामन्यावर विजयाचा झेंडा फडकवला. टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाल्यावर सलामीसाठी मैदानात उतरलेल्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने धडाकेबाज सुरुवात केली. शेफाली वर्माने ९ चेंडूत १६ धावा केल्या.

शेफाली आणि स्मृती मानधना यांनी फक्त ३५ चेंडूत ६४ धावांची भागिदारी केली. तर स्मृती मानधनाने अवघ्या ४२ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी केली. स्मृतीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. स्मृतीच्या धडाकेबाज फलंदाजीमुळं भारताला पाकिस्तान विरोधात विजय संपादन करता आलं. या मोठ्या विजयामुळं टीम इंडिया ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारताकडे दोन गुण असून त्याचा रनरेटही खूप जास्त आहे. पाकिस्तानचा सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत पराभव झाला असून ग्रुपमध्ये ते खालच्या स्थानी आहेत.

स्कोरबोर्ड: पाकिस्तान- 99/10 (18 ओवर), भारत- 102/2 (11.4 ओवर)

पाकिस्तान प्लेइंग-11: इरम जावेद,मुनीबा अली,ओमॅमा सोहेल,बिस्माह मरूफ,आलिया रियाज़,आयशा नसीम,कायनात इम्तियाज़,फातिमा सना,तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन

भारत प्लेइंग-11: स्मृति मानधना, शेफाली वर्मा,यास्तिका भाटिया, रमनप्रीत कौर,जेमिमा रोड्रिगेज़,एस.मेघना,दीप्ति शर्मा,राधा यादव,स्नेह राणा,स्नेह राणा,मेघना सिंह,रेणुका सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT