Asian Games 2023 Mens Hockey final India vs Japan Twitter
Sports

Asian Games 2023: हॉकी इंडियाचा 'गोल्ड'गोल! गतविजेत्या जपानची उडवली दाणादाण, ५-१ ने नमवलं

Asian Games 2023: भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात जपानला पराभूत सुवर्ण पदक जिंकलं आहे.

Vishal Gangurde

Asian Games 2023 Mens Hockey final India vs Japan:

भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात जपानला पराभूत सुवर्ण पदक जिंकलं आहे. या सामन्यात भारताने ५-१ ने दणदणीत विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये तब्बल ९ वर्षांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या हॉकी टीमने चौथ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. भारतीय हॉकी टीमने याआधी १९६६, १९९८, २०१४ आणि २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकलंय. तर भारताने याआधी रौप्यपदक आणि कांस्यपदक देखील जिंकलं आहे.

भारताच्या हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले. तर अभिषेक, अमित रोहिदास आणि मनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला आहे. भारताला १५ व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला.

भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये तिसऱ्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. पण त्यावेळी रोहिदासचा निशाणा चुकला. भारताने २५ व्या मिनिटाला रोहिदासने गोल केला. तर भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. तर हरमनप्रीतने ३२ व्या मिनिटाला आणि रोहिदासने चार मिनिटांनतर एक गोल केला.

चौथ्या क्वार्टरमध्ये तिसऱ्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करत भारताला विजय मिळवून दिला.

भारताची पदकांची कमाई सुरुच

भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई सुरुच आहे. भारताच्या पदकांची संख्या ९० हून पार गेली आहे. भारताला आता १०० हून अधिक पदके मिळविण्याचं आव्हान असणार आहे. भारताने पहिल्यांदा २४ सप्टेंबर रोजी पहिलं पदक जिंकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT