IND VS ZIM Saam tv
क्रीडा

IND VS ZIM : कर्णधार शुभमन गिलने लाजिरवाण्या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? पाहा व्हिडिओ

IND VS ZIM shubman gill : झिम्ब्वावेविरोधात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

IND VS ZIM Shubhman gill : टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत आयोजित केलेल्या विजयी मिरवणुकीला हजारो चाहत्यांनी गर्दी केली. या विश्वचषकाच्या स्पर्धेनंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टी-२० सामन्यात टीम इंडियाने १३ धावांनी सामना गमावला आहे. ११६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली टीम इंडिया १०२ धावांवर ढेर झाली. या लाजिरवाण्या पराभवानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पराभवावर शुभमन गिलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

क्षेत्ररक्षकांनी निराश केलं - गिल

पराभवानंतर शुभमन गिलने म्हटलं की, 'आम्ही गोंलदाजी चांगली केली. परंतु क्षेत्ररक्षकांनी निराश केलं. आम्ही वेळ घेऊन फलंदाजी करु इच्छित होतो. मात्र, असं काही झालं नाही. आमचे पाच गडी झटपट बाद झाले'.

'मी शेवटपर्यंत टिकून खेळलो असतो, तर बरं झालं असतं. मी बाद झालो, त्यानंतर इतर फलंदाजही बाद झाले. यामुळे मी निराश आहे. वाशिंग्टन सुंदरने विजयाची आशा कायम ठेवली. मात्र, तुम्हाला ११५ धावांचा पाठलाग करायचा आहे. १० व्या स्थानावरील खेळाडूही जिंकवण्यासाठी प्रयत्न करतोय. याचा अर्थ काही तरी गडबड आहे, असेही गिल पुढे म्हणाला.

दरम्यान, झिम्ब्वावेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने पावरप्लेमध्ये ४ गडी गमावले. त्यानंतर एक-एक विकेट गेले. झिम्ब्वावेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. शुभमन गिलने २९ चेंडूत ५ चौकार लगावत ३१ धावा कुटल्या. अभिषेक शर्मा, रिंकू सिंह आणि मुकेश कुमार शून्य धावांवर बाद झाले.

ऋतुराज गायकवाड ७, रियान पराग २, ध्रुव जुरेल ६, वाशिंग्टन सुंदरने २७ धावा कुटल्या. तर रवि बिश्नोईने ९ आणि आवेश खानने १६ धावा कुटल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT