ind vs wi  saam tv
Sports

IND vs WI 2nd ODI: भारत - वेस्टइंडीज दुसरा वनडे सामना होणार रद्द? मोठं कारण आलं समोर

Ind vs WI Weather Report: या सामन्यापूर्वी क्रिकेट फॅन्सची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies 2nd ODI: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना शनिवारी (२९ जुलै) बार्बाडोसच्या केनिंग्सटन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

यासह या मालिकेत भारतीय संघाने १-० ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिकूंन भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी क्रिकेट फॅन्सची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

पावसामुळे दुसरा सामना होणार रद्द?

हा सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्ससाठी वाईट बातमी समोर येत आहे. सामना सुरु असताना ढगाळ वातावरण असेल. तसेच पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्के इतकी असणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी ९:३० सुरू होईल.

तर १० ते १२ च्या दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान देखील पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल खेळपट्टी..

बार्बाडोसच्या दुसऱ्या कसोटीतही फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला होता.

दोन्ही संघातील फिरकी गोलंदाजांनी मिळून १५ पैकी १० गडी बाद केले होते. या सामन्यातही फिरकी गोलंदाजांची जादू चालली तर हा सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळू शकतो. (Latest sports updates)

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.

वेस्टइंडीज संघाची प्लेइंग ११:

ब्रँडन किंग, एलिक अथनाज, शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), कीसी कार्टी, शिमरोन हेटमायर, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, डोमिनिक ड्रेक्स, यानिक कारिया, गुडाकेश मोती, जेडेन सील्स.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

WTC Points Table: गुवाहाटी टेस्टमधील पराभव टीम इंडियाला पडणार महागात, WTC पॉईंट्स टेबलमध्ये होणार घसरण, पाहा समीकरण

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT