Axar Patel Record
Axar Patel Record  SAAM TV
क्रीडा | IPL

Axar Patel : अक्षर पटेलची धमाकेदार इनिंग; महेंद्रसिंग धोनीचा १७ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला (व्हिडिओ बघा)

Nandkumar Joshi

मुंबई: वेस्ट इंडीजनं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे कठीण आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे एकेक फलंदाज तंबूत परतले. मात्र, अक्षर पटेलने तुफानी फलंदाजी करत अखेरच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. टीम इंडियानं (Team India) या विजयासह मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. ऑलराउंडर अक्षर पटेल याच्या विध्वंसक अशा या इनिंगमुळे महेंद्रसिंग धोनीचा १७ वर्षे जुना रेकॉर्डही मोडीत निघाला. (India vs West Indies 2nd ODI Match Update News)

टीम इंडियाने वेस्ट इंडीजला (India Vs West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात २ विकेट राखून पराभूत केलं. या विजयासह भारताने या मालिकेत वेस्ट इंडीजवर २-० अशी विजयी आघाडी घेतली. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सुंदर फटकेबाजी बघायला मिळाली. टीम इंडियाचा ऑलराउंडर अक्षर पटेल (Axar Patel) याने विस्फोटक अशी फलंदाजी केली. भारतानं जवळपास गमावलेला सामना जिंकला.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अक्षर पटेलने केवळ ३५ चेंडूंत ६४ धावांची तुफानी खेळी केली. त्यात ३ चौकार आणि ५ षटकार होते. अक्षर पटेलने १८२ च्या स्ट्राइक रेटने या धावा कुटल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. केवळ ३३ चेंडूंवर अक्षर पटेलने दीपक हुड्डा याच्यासोबत ५१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.

भारताला विजयासाठी अखेरच्या १० ओव्हरमध्ये १०० धावांची आवश्यकता होती. अक्षर पटेलच्या धमाकेदार फलंदाजीनं ते शक्य झालं. अखेरच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला ८ धावांची गरज होती. आधी दोन चेंडूंवर एकेरी धावा घेतल्या. त्यानंतर अक्षर पटेलने षटकार ठोकून विजय मिळवून दिला.

अक्षर पटेलने मोडला धोनीचा रेकॉर्ड

अक्षर पटेलने या तुफानी खेळीमुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) रेकॉर्ड मोडला. सातव्या क्रमांकावर फलंदाजी यशस्वी पाठलाग करताना, भारताकडून अक्षर पटेल हा कोणत्याही एका डावात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. अक्षर पटेलने या डावात ५ षटकार लगावले होते. त्याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नावावर हा विक्रम होता. २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध धोनीने तीन षटकार लगावले होते. युसूफ पठाणने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आणि आयर्लंडविरुद्धही यशस्वी पाठलाग करताना एका डावात तीन षटकार लगावले होते.

अखेरच्या १० षटकांत सर्वोत्तम यशस्वी पाठलाग

टीम इंडियाने अखेरच्या १० षटकांत १०० धावा कुटल्या आणि विजय मिळवला. वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना अखेरच्या १० षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. बांगलादेशविरुद्ध त्यांनी अखेरच्या दहा षटकांत १०९ धावा केल्या होत्या आणि विजय मिळवला होता. आता या यादीत भारताचंही नाव जोडलं गेलं आहे. भारतानं याआधी २०१५ मध्ये वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १० षटकांत ९१ धावा करून विजय मिळवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT