Ishan Kishan Yashasvi Jaiswal Debut: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून २ युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.
वेस्टइंडीजविरुद्ध सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात २ यष्टिरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी ईशान किशनला पदार्पण करण्याची संधी दिली गेली आहे. आतापर्यंत त्याने वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो पहिल्यांदाच भारतीय संघासाठी कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
तर चेतेश्वर पुजाराला या मालिकेसाठी विश्रांती दिली गेली आहे. त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालला संघात संधी दिली गेली आहे. यशस्वी जयस्वाल देखील आपला पहिलाच कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
ईशान किशन आणि यशस्वी जयस्वालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने नुकताच संपन्न झालेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. तर ईशान किशनने देखील भारतीय संघाकडून खेळताना धावा केल्या आहेत. ईशान किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ४८ सामन्यांमध्ये २९८५ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)
वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, ईशान किशन (यष्टिरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.
असा आहे वेस्टइंडीजचा संघ :
क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेगनारायण चंद्रपॉल, रेमन रीफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाज, जोशुआ डि सिल्वा (यष्टिरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवाल, अल्जारी जोसेफ, केमार रोच आणि जोमेल वॉरिकन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.