Hardik Pandya Saam Tv
Sports

Hardik Pandya: धोनी, गंभीर नव्हे, 'हा' खेळाडू हार्दिकचा आधारस्तंभ; पांड्या म्हणाला, 'दणदणीत मालिका विजयाचे श्रेयही त्यालाच'

हार्दिक पांड्याच्या कॅप्टनसीचे जोरदार कौतुक होत आहे. याआधी हार्दिकने आयपीएलमध्येही गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात गुजरात संघाने आयपीएलचे विजेतेपदही पटकावले.

Gangappa Pujari

Ind vs SL T20 Siries: भारत आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी ट्वेंटी सामना टीम इंडियाने ९१ धावांनी जिंकला. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही खिशात घातली. रोहित शर्माकडून कर्णधारपद घेतल्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने तिसरा मालिका विजय साकारला आहे.

त्यामुळेच हार्दिक पांड्याच्या कॅप्टनसीचे जोरदार कौतुक होत आहे. याआधी हार्दिकने आयपीएलमध्येही गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात गुजरात संघाने आयपीएलचे विजेतेपदही पटकावले.

गतवर्षी टी ट्वेंटी विश्वचषकात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळेच हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देण्यात आले होते. निवड समितीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत हार्दिकनेही श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजयाने मालिका खिशात घातली. आपल्या कुशल नेतृत्वशैलीचे सारे श्रेय हार्दिकने गुजरात टायटन्स संघाचे कोच आशिष नेहराला दिले आहे.

याबद्दल बोलताना हार्दिक पांड्याने गुजरात संघाचा कोच आणि माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहरामुळे माझ्या कॅप्टनसीमध्ये बदस होत गेला. मी गोष्टी समजून घेत होतो, अशा परिस्थितीत मला पाठिंब्याची गरज होती, जी मला नेहरामुळे मिळाली, असे म्हणत सगळे श्रेय नेहराच्या मार्गदर्शनाला दिले.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला. यावेळी सुर्यकूमार यादवने (Suryakumar Yadav) तुफान खेळी करत शानदार शतक साजरे केले. टी ट्वेंटी सामन्यातील विजयानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT