India vs Srilanka Weather Report: saam tv
Sports

IND vs SL Weather Update: पाकिस्तान पाठोपाठ लंकेविरूद्धच्या सामन्यातही पाऊस ठरणार व्हिलेन? पाहा कसं असेल कोलंबोतील हवामान

India vs Srilanka Weather Report: या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसं असेल कोलंबोतील हवामान

Ankush Dhavre

IND vs SL Weather Update:

आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील पहिल्या सामन्यात भारत संघाने दमदार सुरूवात केली आहे. रविवारी आणि सोमवारी भारताचा संघ पाकिस्तान संघाविरूद्ध २ हात करण्यासाठी मैदानावर उतरला होता.

आता सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार हा सामना देखील कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान सामन्यापूर्वी जाणून घ्या कसं असेल कोलंबोतील हवामान.

कसं असेल कोलंबोतील हवामान..

वेदर डॉट कॉमने दिलेल्या अहवालानुसार भारत-श्रीलंका यांच्यातील सामना दरम्यान पाऊस पडू शकतो. सामन्यातील षटकं कमी होतील, मात्र सामना रद्द होण्याची शक्यता खूप कमी आहे. दुपारी १ पासून ते संध्याकाळी ५ पर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्री १० च्या नंतर जो पाऊस सुरू होईल तो पूर्ण रात्र थांबणार नाही, असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय संघाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?

भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याच दमदार कामगिरी केली आहे. याचा फायदा भारतीय संघाला होणार आहे. भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

जो संघ हा सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. कारण भारतीय आणि श्रीलंका या दोन्ही संघांना १-१ विजय मिळवला आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

SCROLL FOR NEXT