Asia Cup Final, Team India SAAM TV
Sports

IND vs SL, Weather Update: भारत - श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल?

India vs Srilanka, Asia Cup Final 2023: जाणून घ्या या सामन्यादरम्यान कसे असेल कोलंबोतील हवामान.

Ankush Dhavre

IND vs SL, Asia Cup Final 2023 Weather Update:

आशिया चषकात असा एकही सामना नसेल ज्यात पावसाने खोळंबा घातला नसेल. पावसामुळे भारत - पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला होता. तर काही सामन्यांचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला.

स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल कोलंबोतील हवामान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण होणार विजयी? जाणून घ्या.

कसं असेल हवामान ?

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात होणारा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावेळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी कोलंबोत पाऊस पडण्याची शक्यता ही ९० टक्के इतकी असणार आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. दरम्यान दुपारी पाऊस पडण्याची शक्यता ही अधिक असणार आहे.

सामना रद्द झाल्यास काय होणार?

या स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता. त्यानंतर सुपर ४ फेरीत जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. या सामन्याचा निकाल राखीव दिवशी लागला होता.

ज्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. आता खबरदारी म्हणून अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली आहे. हा सामना जर आज पूर्ण झाला नाही तर हा सामना १८ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. जर या दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही तर, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. (Latest sports updates)

आशिया चषक स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ..

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा.

आशिया चषकासाठी असा आहे श्रीलंकेचा संघ :

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना, साहन अराचचेगे, दुशान हेमंथा, कासुन रजिता, बिनुरा फर्नांडो, दिमुथ करुणारत्ने.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe: मुंबई स्टाईल चमचमीत पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने नंदुरबारमध्ये शेतकरी संतप्त

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

Gold- Silver Price: सोन्याला पुन्हा चकाकी! १० तोळे १२००० रुपयांनी महागले; २४-२२ कॅरेटचे आजचे दर किती?

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी शिर्डीकरांकडून मदतीचा हात

SCROLL FOR NEXT