Ind vs SL ODI Series: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकाही खिशात घातली. या सामन्यात कुलदिप यादवने आपल्या फिरकीच्या जादूने लंकन फलंदाजांना चांगलेच हैराण केले. कुलदिपने या सामन्यात दहा षटकात ५१ धावा देत तीन बळी घेतले.
मात्र तरीही कुलदिप यादवला ड्रेसिंग रुममध्ये सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. या सामन्यात कुलदिप यादवच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. तरीही ड्रेसिंग रुममध्ये त्याला सुणावण्यात आले. वास्तविक, या सामन्यात कुलदीप यादवने फ्रि हिटवर मारलेल्या एका शॉटबद्दल ड्रेसिंग रुममध्ये त्याला काही गोष्टी बोलण्यात आल्या.
याबद्दलचा खुलासा करताना तो म्हणाला की “फ्रि हिटवर मी कट मारुन फिल्डरच्या डोक्यावर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सरळ हातामध्ये गेला. यासाठी मला ड्रेसिंग रुममध्ये बरच काही बोललं गेलं. मी आता याच्यावर काम करीन. संधी मिळेल, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.”
या सामन्यावेळी युजवेंद्र चहलने मॅचच्या आधी टीप्स दिल्याच कुलदीपने सांगितलं. “मॅचच्याआधी तुम्ही दिलेल्या टिप्स उपयोगाला आल्या. टेस्ट फॉर्मेटमधून मी वनडे खेळायला आलो होतो. तू सतत टी 20 आणि वनडेमध्ये खेळत होता. त्यामुळे तू दिलेला सल्ला उपयोगाला आला” असं कुलदीप म्हणाला.
दरम्यान, या विजयासोबतच भारतीय संघाने टी ट्वेंटी (T20) मालिकेसोबत आता एकदिवसीय मालिकाही खिशात घातली आहे. या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरम मध्ये होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.