India Win 2nd ODI: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने चार विकेट्सनी विजय मिळवला. यासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील 2-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने भारतासमोर 215 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने 43.2 षटकात 6 विकेट गमावत 219 धावा करत सामना जिंकला. केएल राहुलने अर्धशतकीय निर्णायक खेळी केली.
श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात जबरदस्त सुरुवात करुन देणारे रोहित-शुभमन स्वस्तात माघारी फिरले. रोहित शर्मा अवघ्या 17 धावा करून बाद झाला. तर शुभमन गिलदेखील 21 धावा करून परतला.
मागील सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहलीही काही खास करु नाही. तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तोही 28 धावा करुन बाद झाला.
त्यानंतर हार्दिक पांड्याने 36 धावांची तर अक्षर पटेलने 21 धावांची चांगली खेळी केली. केएल राहुल शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने 103 चेंडूंचा सामना करत नाबाद 64 धावा केल्या.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 39.4 षटकांत सर्वबाद 215 धावा केल्या. नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 34 धावा केल्या.भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. तर उमरान मलिकने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.