Team India Saam Tv
क्रीडा

Cricket News: श्रीलंकेविरुद्ध T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होताच 'या' खेळाडूला बसणार धक्का; संघातून होणार पत्ता कट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ind Vs Sl: बांग्लादेश दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा नववर्षातील पहिला दौरा हा श्रीलंकेविरुद्ध असेल. तीन जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यामध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आहे त्याचसोबत या दौऱ्यामध्ये १० जानेवारीपासून तीन एकदिवसीय सामनेही खेळवले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर तीन टी ट्वेंटी सामन्यासाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा होणार आहे.

भारतीय संघाची घोषणा होताच एका खेळाडूला मात्र मोठा धक्का बसणार आहे. कारण या श्रीलंका दौऱ्यातील (Srilanka Tour) टी ट्वेंटी संघातून त्याचा पत्ता कट होऊ शकतो. तो खेळाडू म्हणजेच संजू सॅमसन. या दौऱ्यासाठी संजू सॅमसनची निवड होणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की , श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटी सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत आणि ईशान किशन यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे अशावेळी भारतीय संघाला तिसऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाची गरज नसेल. त्याचसोबत श्रीलंकेविरुद्धच्या या टी ट्वेंटी सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये अष्टपैलू खेळाडू खेळवण्याकडे निवड समिती लक्ष देईल. त्यामुळे अक्षर पटेल आणि दिपक हुड्डा यांची निवड होऊ शकते.

अशावेळी संजू सॅमसनची संघात निवड होणे अशक्य मानले जात आहे. कारण संघामध्ये तीन विकेटकिपर एकाचवेळी खेळवणे अशक्य आहे. त्याचबरोबर संघात जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू खेळवल्याने फलंदाजी आणि गोलंदाजीतही संघ मजबूत होईल.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ: (Indian Cricket Team)

शुभमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कप्तान),रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, दीपक हुड्डा, संजू सॅमसन (विकेटकीपर), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अक्षर पटेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: आऊट असूनही अंपायरने नॉटआऊट दिलं; अंपायरच्या निर्णयावर Harmanpreet भडकली! नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

SCROLL FOR NEXT