Cricket News: 'या' पाच खेळाडूंनी वाढवली केएल राहुलची डोकेदुखी, जागा बळकावण्यासाठी ठरु शकतात प्रबळ दावेदार

टीम इंडियाकडे असेही काही खेळाडू आहेत जे के एल राहुलच्या जागी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
K L Rahul
K L RahulSaam Tv
Published On

Cricket News: टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार खेळाडू केएल राहुलचा खराब फॉर्म हा सध्या चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकातही के एल राहुलच्या खराब फॉर्मचा फटका भारतीय संघाला बसला. त्याचबरोबर बांग्लादेशविरुद्धही त्याची बॅट तळपली नाही.

के एल राहुलच्या या खराब फॉर्ममुळे त्याचे संघातील स्थान सध्या धोक्यात आले आहे. अशावेळी टीम इंडियाकडे असेही काही खेळाडू आहेत जे के एल राहुलच्या जागी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पाहूया अशाच पाच खेळाडूंची कारकिर्द.. (Indian Cricket Team)

K L Rahul
Palghar Crime : कारवाई टाळण्यासाठी मागितली २ लाखांची लाच; महावितरणचे दोन वरिष्ठ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

शुभमन गील- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीतून बाहेर येवून सलामीला उतरेल. अशावेळी रोहित सोबत शुभमन गील सलामीला फलंदाजी करु शकतो. शुभमन गीलने नुकत्याच झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात जोरदार शतकही झळकावले आहे. त्यामुळे तो केएल राहुलच्या जागी प्रभावी ठरु शकतो.

संजू सॅमसन- यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसनला भारतीय संघात फारशी संधी मिळाली नसली तरी तो टि ट्वेंटीमध्ये सलामीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे त्याच्या नावाचीही के एल राहुलच्या जागी दावेदारी मानली जाऊ शकते. संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय सामन्यात आत्तापर्यंत चारवेळा सलामीसाठी फलंदाजी केली असून यामध्ये त्याने १०५ धावा ठोकल्या आहेत.

ईशान किशन- के एल राहुलच्या जागी सर्वात प्रबळ दावेदार म्हणून ईशान किशनच्या नावाचा विचार होऊ शकतो. स्फोटक फलंदाज ईशान किशनने २१ टि ट्वेंटी सामन्यांमध्ये २९.४५ च्या सरासरीने ५८९ धावा ठोकल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने जोरदार द्विशतक झळकावले होते.

K L Rahul
Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंची तरुणांना पोलिसांसमोर मारहाण; जितेंद्र आव्हाडांनी केला VIDEO ट्विट

ऋतुराज गायकवाड: महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडनेही जोरदार धावा ठोकल्या आहेत. अलिकडेच विजय हजारे ट्रॉफित त्याने चार शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने उत्तरप्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात तब्बल सहा षटकार लगावले होते. त्यामुळेच के एल राहुलच्या जागी हा सुद्धा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो.

पृथ्वी शॉ: 23 वर्षीय पृथ्वी शॉ टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलचा चांगला पर्याय असू शकतो. या मोसमात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता. भारतीय संघाला विशेषत: टी-२० फॉरमॅटमध्ये नवीन संघ बनवायचा असेल, तर पृथ्वी शॉ महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com