India vs Sri Lanka X/social media
Sports

India vs Sri Lanka: टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून लंकादहन! 302 धावांनी नमवत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka: विश्वचषकाच्या ३३ व्या सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचे फलंदाज ढेर झाले.

Vishal Gangurde

India vs Sri Lanka World Cup 2023:

विश्वचषकाच्या ३३ व्या सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचे फलंदाज ढेर झाले. टीम इंडियाने तब्बल ३०२ धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळाल्याने टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (latest Marathi News)

विश्वचषकातील ३३ सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलदाजांची दाणादाण उडवली. टीम इंडियाने श्रीलंकेला अवघ्या ५५ धावांत गुंडाळलं आहे. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाने भेदक माऱ्यामुळे लंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय प्राप्त केला आहे. लंकेने १९.४ षटकात सर्वबाद फक्त ५५ धावा केल्या. यामुळे टीम इंडियाचा तब्बल ३०२ धावांनी विजय झाला

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात ५ फलदाजांना तंबूत धाडलं. शमीने ५ षटकात १८ धावा देऊन पाच गडी बाद केले. मोहम्मद सिराजने तीन गडी बाद केले, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक-एक गडी बाद केले.

टीम इंडियाची तुफानी फलंदाजी

प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. रोहित शर्मा अवघ्या ४ धावांवर बाद झाला. पहिल्याच षटकात मदुशंकाने रोहितची दांडी गुल केली. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने संघाचा डाव सावरला. दोघांनी १८९ धावांची भागीदारी रचली.

मदुशंकाने ३० व्या षटकात गिलला बाद करत दोघांची जोडी फोडली. गिल ९२ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली ८८ धावांवर बाद झाला. अवघ्या १२ धावांसाठी विराटचं शतक हुकलं. पुढे केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने ६० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर राहुल १९ धावांवर बाद झाला. तर सूर्यकुमारही स्वस्तात तंबूत परतला. टीम इंडियाने ५० षटकात ८ गडी गमावून ३५७ धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Maharashtra Live News Update: मतदान जागृतीसाठी पीएमपीएमएल कडून अनोखे गीत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

Contrast Saree Blouse : साडीसोबत घाला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज; सणासुदीला मिळेल परफेक्ट लूक, सगळेच म्हणतील WOW

SCROLL FOR NEXT