Who is Mukesh kumar Saam TV
Sports

Mukesh Kumar : IPL लिलावात ५.५० कोटींची बोली, आता थेट टीम इंडियात स्थान; मुकेश कुमार आहे तरी कोण?

श्रीलंकेविरोधातील टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठीसह मुकेश कुमारचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुकेश कुमार नेमका आहे तरी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Satish Daud

India vs Sri Lanka T-20 Series : येत्या ३ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली असून युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठीसह आयपीएलच्या लिलावातून चर्चेत आलेल्या मुकेश कुमारचा समावेश आहे. त्यामुळे मुकेश कुमार नेमका आहे तरी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.  (Latest Marathi News)

कोण आहे मुकेश कुमार?

मुकेशबद्दल बोलायचे झाले, तर तो बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. मुकेशने सैन्यात भरती होण्यासाठी तीनदा प्रयत्न केला होता. मात्र, तीनही वेळा तो अपयशी ठरला. मुकेशला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. आपल्या खेळाच्या जोरावर त्याने बिहारच्या अंडर-१९ संघातदेखील एन्ट्री केली होती.

एका सामन्यासाठी मिळायचे ५०० रुपये

मुकेशने कोलकात्यात एका खासगी क्लबसाठी खेळायला सुरूवात केली. त्याला एक सामना खेळायचे केवळ ५०० रुपये मिळायचे. २०१४ मध्ये त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला.२०१५ मध्ये मुकेशने बंगालसाठी पदार्पण केले.

मुकेशवर आयपीएलमध्ये लागली कोट्यावधींची बोली

नुकताच आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला. या लिलावात विदेशी खेळाडूंबरोबरच भारतीय खेळाडूंवरही चांगलीच बोली लागली. युवा अनकॅप खेळाडू मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने ५.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. मुकेशची बेस प्राईस किंमत २० लाख रुपये होती. त्याला त्याच्या बेस प्राईसच्या २७ पट अधिक किंमत मिळाली आहे.

मुकेश कुमारची प्रथम श्रेणी कारकीर्द

मुकेश कुमार हा अष्टपैलू खेळाडू आहे त्याने ३३ प्रथम श्रेणी सामन्यात १२३ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ वेळा एका डावात ४ आणि ६ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने २४ लिस्ट ए सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत. T20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर मुकेशने २३ सामन्यात २५ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

Maharashtra Rain Live News : उल्हासनगरमधील जसलोक हायस्कूलजवळील घराची भिंत कोसळली

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

दारूच्या नशेत महिलांनी घातला राडा, मुंबई-पुणे हायवेवर तुफान हाणामारी | VIDEO

SCROLL FOR NEXT