sri lanka  sri lanka
Sports

IND vs SL, 1st ODI: श्रीलंकेने तोंडचा घास पळवला! भारत- श्रीलंका पहिला वनडे सामना टाय

India vs Sri Lanka, 1st ODI Result: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेला पहिला सामना बरोबरीत समाप्त झाला आहे.

Ankush Dhavre

टी-२० मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकेलाही विजयाने सुरुवात केली आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने कसाबसा विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २३१ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाची पावरपॅक बॅटिंग लाईनअप पाहता, भारतीय संघासाठी हे आव्हान खूप कमी होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना घाम फोडला. दरम्यान हा सामना बरोबरीत समाप्त झाला आहे.

भारताची शानदार सुरुवात

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून ७५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितने ४७ चेंडूंचा सामना करत ५८ धावा चोपल्या. तर शुभमन गिल १६ धावा करत माघारी परतला. १० महिन्यांनंतर वनडेत कमबॅक करत असलेल्या विराट कोहलीला या सामन्यात शानदार सुरुवात मिळाली. मात्र त्याला सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. तो २४ धावा करत माघारी परतला.

भारतीय संघाची शानदार सुरुवात झाल्यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सामना फिरवला. सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकत होता. मात्र केएल राहुल आणि अक्षर पटेलने महत्वपूर्ण भागीदारी करत कमबॅक करुन दिलं. अक्षर पटेलने ३३ तर केएल राहुलने ३१ धावांची खेळी केली. शेवटी शिवम दुबेने महत्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. मात्र शेवटी श्रीलंकेने दमदार कमबॅक केलं.

भारतीय संघाला विजयासाठी शेवटी ५ धावांची गरज असताना शिवम दुबे स्ट्राईकवर होता. त्यावेळी त्याने चौकार मारला आणि धावसंख्या बरोबरीत आणली. मात्र त्यानंतर शिवम दुबे बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर अर्शदीप सिंगला १ धाव घ्यायची होती. मात्र त्यावेळी त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या नादात तो पायचित झाला आणि सामना बरोबरीत समाप्त झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT