Ind vs SA, T20 World Cup Final Today, Rohit Sharma, Team India BCCI/X
Sports

T20 world cup Final : रोहित शर्मा आणि विजयाची गॅरंटी; टी२० वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार, १० वर्षांतील रेकॉर्ड वाचा

Ind vs SA, T20 World Cup Final Today : भारताचा कर्णधार रोहित शर्माची बॅट फायनलमध्ये तळपली तर, टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार याची गॅरंटी आहे. रेकॉर्ड बघून तर विजयाची खात्री नक्कीच पटेल.

Nandkumar Joshi

टी २० वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये आज, शनिवारी होणार आहे. मागील १० वर्षांत केवळ ४ नॉकआऊट सामने जिंकणारी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला नमवून विजेतेपद पटकावणार का, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अंतिम सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली तर विजयाची गॅरंटी नक्की असं आता तरी त्याच्या वैयक्तिक रेकॉर्डमुळं मानलं जातंय.

भारतीय संघानं (Team India) मागील १० वर्षांत फक्त 'नॉकआउट'मधील चार सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यात एकही फायनल जिंकली नाही. २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२१ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, २०२३ मधील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

या सर्व सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली नाही. यात काही उपांत्य फेरीचे सामनेही झाले होते. त्यातील बऱ्याच सामन्यांत भारताचा पराभव झाला होता. त्यातही रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या. पण नॉकआऊटमधील ४ सामन्यांत भारताला विजय मिळाला, त्यात रोहित शर्मानं तुफान फलंदाजी केली होती. त्यामुळं रोहित शर्माची बॅट तळपली तर, फायनलमध्ये भारताचा विजय पक्का आहे, असं बोललं जात आहे.

रोहित शर्मामुळं विजयाची गॅरंटी

गेल्या दहा वर्षांतील रेकॉर्ड बघितला तर, वर्ल्डकप २०१५ मध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं विजय मिळवला होता. त्यात भारताला विजय मिळाला होता. रोहित शर्माने त्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध १२६ चेंडूंत १३७ धावा कुटल्या होत्या.

२०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत भारताने बांगलादेशला पराभूत केलं होतं. त्यातही रोहितने ११९ चेंडूंत १२३ धावांची जबरदस्त खेळी केली होती. तर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे वर्ल्डकप २०२३ च्या उपांत्यफेरीत भारत जिंकला होता. रोहितने २९ चेंडूंत ४७ धावा ठोकल्या होत्या. तर यंदाच्या टी २० वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्येही भारतानं विजय मिळवला. यात रोहित शर्मा चमकला. त्याने ३९ चेंडूंत ५७ धावा कुटून काढल्या. त्यामुळं रोहित शर्मा खेळला तर, फायनलमध्ये विजय नक्की होईल, असं बोललं जातं.

रोहित शर्माकडेच सगळ्यांच्या नजरा

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जास्त वेळ क्रीजवर असायला हवा, असंच सर्व क्रिकेटप्रेमींना वाटतंय. रोहित शर्माने पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली तर त्याच्या वैयक्तिक धावा ३० ते ४० असतील. त्यामुळे पॉवर प्लेमध्येच भारतीय संघाच्या ६०-७० धावा होतील. त्यामुळे नंतर मैदानात उतरणाऱ्या फलंदाजांवर दबाव येणार नाही. अक्षर पटेलपर्यंत तगडा फलंदाजी क्रम आहे. तो आठव्या क्रमांकावर येतो. अशा प्रकारे सर्व फलंदाजांनी १०-१५ चेंडू खेळून त्यात २०-२२ धावा केल्या तरी, मोठी धावसंख्या भारतीय संघ उभारू शकेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT