विराट कोहली आणि भारतीय संघ आप्रिकेत विजय मिळवण्यासाठी हर एक प्रयत्न करताना दिसत आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुक्रवारी सुपरस्पोर्ट पार्कमध्ये संघाची रणनीती, खेळपट्टी आणि प्लेइंग इलेव्हनबाबतीत मार्गदर्शन केले आणि संघाच्या विजयाती रणनीती काय असावी याबाबत मार्गदर्शन करताना दिसले.
द्रविड दोन पांढरे फलक जमिनीवर आणून सामन्यासाठी संघ-रणनीतीवर चर्चा करताना दिसले. द्रविड व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या संदेशाकडे बोट दाखवत असताना कर्णधार विराट कोहलीसह (Virat Kohli) संपूर्ण संघाचे लक्ष वेधत संघाची रणनीती ठरवत आहे.
हे फोटो पाहून आपल्याला राहुल द्रविड (Rahul Dravid) जेव्हा खेळत होता तेव्हाची आठवण करुन देतात. जसे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन त्यांच्या संघासोबत 'ओपन-सेशन' घेत असत. कर्स्टन यांना सराव सत्रादरम्यान व्हाईट-बोर्ड वापरण्याची सवय होती आणि द्रविड अगदी आपल्या कोचला फॉलो करताना दिसत आहे.
रविवारपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका हा एकमेव नियमित कसोटी खेळणारा देश आहे जिथे भारताने (Team India) अद्याप एकही मालिका जिंकलेली नाही.
उपकर्णधार केएल राहुलने (KL Rahul) शुक्रवारी भारताच्या सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, ''आम्ही भारताबाहेर मालिका जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे''. आम्ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकल्या आहेत, ज्यामुळे आमचा खूप आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नाही, ज्यामुळे आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करण्यासाठी अतिरिक्त प्रेरणा मिळते असे राहूल म्हणाला.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.