भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी २० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. भारताने २० षटकअखेर २८३ धावांचा डोंगर उभारला.
या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १४८ धावांवर आटोपला. भारताने हा सामना १३५ धावांनी जिंकला. यादरम्यान भारतीय फलंदाजांनी अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.
या सामन्यात भारतीय फलंदाज संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यात रेकॉर्डब्रेक भागीदारी झाली. दोघांनी मिळून ८६ चेंडूत नाबाद २१० धावांची भागीदारी केली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्माने मिळून २१० धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने नाबाद १०९ तर तिलक वर्माने १२० धावांची खेळी केली.
संजू आणि तिलक यांच्यात आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी पाहायला मिळाली. दोघांनी २८६ धावा जोडल्या.
भारताने या डावात २० षटक अखेर २८३ धावा केल्या. यासह परदेशात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही मोडून काढला आहे.
टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा असं घडलय, जेव्हा एकाच संघातील २ फलदांजांनी शतकं झळकावली आहेत. भारतीय संघाकडून हे पहिल्यांदाच घडलं.
भारतीय फलंदाजांनी या डावात एकूण २३ षटकार खेचले. हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेचलेले सर्वाधिक षटकार आहेत.
संजू सॅमसनने या सामन्यात वैयक्तिक तिसरं शतक झळकावलं. यासह तो एकाच वर्षात ३ शतकं झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.