india vs South Africa Highlights  Saam tv
क्रीडा

india vs South Africa Highlights : जबरदस्त! टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ; मालिकाही २-१ ने जिंकली

Vishal Gangurde

india vs south africa 3rd odi Highlights :

टीम इंडियाच्या यंगीस्थानने मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७८ धावांच्या फरकांनी धूळ चारली आहे. मालिकेच्या 'करो या मरो'च्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकाही जिंकली आहे. भारताने २-१ ने मालिका जिंकली आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर मात

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावून २९६ धावा केल्या. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना डी जॉर्जीने अर्धशतकीय खेळी खेळूनही दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.५ षटकात २१८ धावा करत गारद झाला. टीम इंडियाने तब्बल ७८ धावांच्या फरकाने सामना जिंकला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतासाठी अर्शदीप सिंहने ४, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. भारताने दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर मालिका जिंकली आहे. याआधी टीम इंडियाने ५-१ ने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ठरली फ्लॉप

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. रीजा हँड्रिक्स आणि जॉर्जीने पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली. हँड्रिक्सने २४ चेंडूत १९ धावा केल्या.

डुसेनने १७ चेंडूत दोनच धावा केल्या. मार्करमने ४१ चेंडूत ३६ धावा केल्या. डी जॉर्जीने ८७ चेंडूत ८१ धावा केल्या. क्लासेनने २१ धावा केल्या. मुल्डरने १, डेव्हिड मिलरने १०, केशव महाराजने १४ आणि विलियम्सने दोन धावा केल्या. हँड्रिक्सने १८ धावा केल्या.

भारताची दमदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेला संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावत २९७ धावांचं आव्हान दिलं . टीम इंडियासाठी संजू सॅमसनने सर्वाधिक १०८ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेसाठी ब्यूरन हँड्रिक्सने तीन गडी बाद केले. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ८ विकेटने सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून भारतावर विजय मिळवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT