suryakumar yadav twitter
Sports

IND vs SA 2nd T20I: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली! दुसरा सामना किती वाजता सुरू होणार?

India vs South Africa 2nd T20I Time And Date: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्याची वेळ बदलली आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd T20I: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ४ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६१ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने टी -२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आज या मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. दरम्यान हा सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना केव्हा रंगणार आहे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा सामना आज (८ नोव्हेंबर) रंगणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना कुठे रंगणार आहे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना गकेबरहातील सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर रंगणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

या मालिकेतील पहिल्या सामन्याला ८:३० वाजता सुरुवात झाली होती. तर नाणेफेक ८ वाजता झाला होता. मात्र दुसऱ्या सामन्याची सुरुवात एक तास आधी, म्हणजे ७:३० ला होणार आहे. तर टॉस ७ वाजता होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना स्पोर्ट्स स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहता येईल.

इथे पाहा फुकटात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमा ॲपवर लाईव्ह पाहता येईल.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ- संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका- रिजा हेंड्रिक्स, रियान रिकेल्टन, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, गेराल्ड कोएत्ज़ी, नकाबायोमज़ी पीटर आणि ओटनील बार्टमन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT