भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना टीम इंडियानं शानदारपणे जिंकला. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर १७६ धावांचे आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना आफ्रिकेच्या संघाच्या नाकीनऊ आले. भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाच्या गोलंदाजानी संपूर्ण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या ७४ धावांवर ऑलआउट केलं. या विजयासह भारतीय संघानं ५ सामन्याच्या टी२० मालिकेत १-०नं आघाडी घेतलीय.
दोन महिन्यांनी सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही टी-२० मालिका महत्त्वाची मानली जाते. यात भारतीय संघानं विजयानं सुरुवात केलीय. टीम इंडियासाठी हा शानदार विजय राहिला कारण या सामन्यात भारतीय संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी आफ्रिकेच्या विकेट काढल्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खराब राहिली नाही. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकला बाद केले. त्यानंतर लगेचच ट्रिस्टन स्टब्स देखील अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला.
एडेन माक्ररम आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी काही मोठे फटके मारले, पण अक्षर पटेलने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार माक्ररमला बाद केलं. त्यानंतर हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी दक्षिण आफ्रिकेला फक्त ७४ धावांत गुंडाळले. भारताकडून अर्शदीप, बुमराह, अक्षर आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आफ्रिकन संघ १२.३ षटकांतच आपला गाशा गुंडाळला. ही दक्षिण आफ्रिकेची टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यांचा मागील सर्वात कमी धावसंख्या २०२२ मध्ये भारताविरुद्धच होता. त्यावेळी त्यांनी ८७ धावा केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.