ind vs pak saam tv
क्रीडा

India vs Pakistan Match Date: डायरीत नोट करून ठेवा! भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख अन् ठिकाण ठरलं

Ind vs Pak World Cup Match: भारत पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

Ankush Dhavre

Ind vs Pak: भारत पाकिस्तान सामन्याची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. द्विपक्षीय मालिका खेळत नसल्याने हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. त्यामुळे हा हाय व्हॉल्टेज सामना पाहण्यासाठी चाहते लाखोंच्या संख्येने गर्दी करत असतात.

आता सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे की, आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे रंगणार आहे. याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. (India vs Pakistan Match Details)

क्रिकबझच्या वृत्तानुसार हा बहुप्रतीक्षित सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. कारण या दिवशी रविवार आहे. हा सामना जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा म्हणून खास प्लॅन केला गेला आहे.

हा सामना १ लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता असणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानातील चाहत्यांसह जगभरातील क्रिकेट चाहते देखील हजेरी लावू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार याच मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ ऑक्टोबर रोजी पहिला सामना रंगणार आहे.

तर ९ नोव्हेंबर रोजी याच मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयकडून वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते. (Latest sports updates)

अहमदाबादमध्ये खेळण्यास पाकिस्तानचा नकार..

मिळालेल्या माहीतीनुसार पाकीस्तानने भारतात येऊन खेळण्यास होकार दिला आहे. मात्र काही अटी देखील ठेवल्या आहेत. अशी माहिती समोर येत आहे की , पाकिस्तानचा संघ अह्मदाबादच्या मैदानावर खेळण्यास तयार नाहीये. त्यांना सामन्याचे ठिकाण बदलून हवे आहे. मात्र जर पाकिस्तान संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर पाकिस्तानले हा सामना अहमदाबादच्या मैदानावरच खेळावा लागणार आहे. अशी माहिती समोर येत आहे की, पाकिस्तान संघाचे सामने हे चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबादच्या मैदानावर रंगणार आहे.

तसेच या सामन्यांचे कोलकाता, दिल्ली, इंदौर, धर्मशाळा, गुवाहाटी, राजकोट, रायपुर आणि मुंबईमध्ये केले जाणार आहे. मोहाली आणि नागपूरला या यादीतून वगळण्यात आले आहे. स्पर्धेच्या सेमी फायनलच्या सामन्यांचे आयोजन मुंबईत तर अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Ulhasnagar Rada : उल्हासनगरमध्ये मोठा राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्या कारवर दगडफेक, उमेदवाराची मुलगीही उपस्थित

Dog paragliding with owner: कुत्र्याने केले मालकासोबत पॅराग्लायडिंग, असा 'थ्रील' योग्य की अयोग्य? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा 

Maharashtra Election: नाद करा पण आमचा कुठं? शरद पवारांच्या इशाऱ्याला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर

Weather Update: राज्यात थंडीला सुरुवात, आजपासून गारठा वाढणार

SCROLL FOR NEXT