India vs Pakistan cricket  Saam tv
Sports

India vs Pakistan : राडा होणार! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार

India vs Pakistan cricket match News : भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहे. विश्व चषक स्पर्धेत दोन्ही पारंपरिक स्पर्धेक आमनेसामने येणार आहेत.

Vishal Gangurde

भारत-पाकिस्तान महिला संघातील सामना ५ ऑक्टोबर रोजी होणार

भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंतचे सर्व ११ सामने जिंकलेत

भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश

या सामन्याची वेळ दुपारी ३ वाजता निश्चित

भारतीय क्रिकेट टीमने आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानला तीन वेळा धूळ चारली. पाकिस्तान या स्पर्धेत फायनलला पोहोचली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. क्रिकेटमधील हे पारंपरिक प्रतिस्पर्धक पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आता विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.

महिला विश्व चषक २०२५ स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताची महिला टीम उद्या मैदानात खेळताना दिसेल. तर या स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि श्रीलंकेचा पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना गुवाहाटी येथे होईल. तर भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना हा श्रीलंकेत होईल.

महिला वनडे विश्व चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तानची लढत ५ ऑक्टोबर रोजी होईल. श्रीलंकेच्या कोलंबो येथे हा सामना होईल. दोन्ही संघामधील हा सामना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता सुरु होईल.

भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघात आतापर्यंत ११ वनडे सामने झाले आहेत. त्यातील सर्व सामने भारताने जिंकले आहेत. आतापर्यंत पाकिस्तानला एकही सामना जिंकचा आला नाही. त्यामुळे पुरुषांच्या भारतीय टीमसारखं महिला टीम देखील पाकिस्तानवर भारी पडणार आहे.

भारतीय महिला वनडे टीम : प्रतीका रावल, स्मृति मंधाना, हरलीन देयोल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, उमा छेत्री, श्री चरणी, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष, रेणुका सिंह ठाकुर, अरुंधती रेड्डी, राधा यादव, क्रांति गौड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT