Rohit Sharma, Babar Azam, World Cup 2023 SAAM TV
क्रीडा

Ind Vs Pak : रोहित शर्माचा पाकिस्तानविरुद्ध मोठा प्लान?; सगळ्यांनाच देऊ शकतो आश्चर्याचा धक्का

Rohit Sharma News : पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये आयत्या वेळेला बदल करू शकतो.

Nandkumar Joshi

Team India Playing 11 Prediction :

वर्ल्डकप २०२३ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना शनिवारी, १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचाच, असा टीम इंडियाचा मानस असेल. कर्णधार रोहित शर्मानंही मोठा प्लान आखल्याचे बोलले जाते. पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये आयत्या वेळेला बदल करू शकतो, अशी चर्चा क्रिकेटमधील जाणकारांमध्ये सुरू आहे.

मोहम्मद सिराज हा टीम इंडियातील महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे.

वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानीही होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सिराजला बाहेर बसावे लागणार आहे. त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. त्यामागे अनेक कारणे सांगितली जातात.  (Latest sports updates)

शमी हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्या संघाचा प्रमुख गोलंदाजही आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे आणि हा गुजरात संघाचा होम ग्राउंड आहे. (India Vs Pakistan)

शमीला या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. पाकिस्तानला रोखण्यासाठी शमीच्या रुपाने मोठा अस्त्र रोहित शर्माकडे आहे. त्यामुळे त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो.

सिराजचा खराब फॉर्म

रोहित शर्मा सिराजच्या जागी शमीला खेळवू शकतो. कारण अलीकडच्या काही सामन्यांत सिराजची कामगिरी खराब झाली आहे. सिराजने आशिया चषकाच्या फायनलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती.

श्रीलंकेविरुद्ध सहा गडी गारद केले होते. मात्र, त्यानंतर त्याची जादू फारशी चालली नाही. त्यानंतरच्या तीन सामन्यात एकच गडी बाद करता आला. तर इकॉनॉमी रेटही खूपच खराब आहे. अशावेळी सिराजला बाहेर बसवून शमीला संधी दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT