Shubman Gill : शुभमन गिलची अहमदाबाद स्टेडियमधील कामगिरी पाकिस्तानची झोप उडवणारी; पाहा आकडेवारी

World Cup 2023, IND vs PAK : शुभमन गिल डेंग्यूमुळे संघाबाहेर असल्याने त्याला पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळता आले नाही.
 shubman gill
shubman gill Saam TV
Published On

World Cup 2023 :

वर्ल्डकप २०२३ मध्ये बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना येत्या १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम हा सामना होणार आहे.

शुभमन गिल डेंग्यूमुळे संघाबाहेर असल्याने त्याला पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळता आले नाही. मात्र अहमदाबादमधील सामन्यात भारताचा ओपनर शुभमन गिल मैदानात उतरेल अशी आशा सर्व क्रिकेटप्रेमींना आहे. गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. कारण शुभमन गिलचे अहमदाबादमधील स्टेडियममधील रेकॉर्ड्स खूप काही बोलून जातात. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदी मैदानातील IPLमधील कामगिरी

शुभमन गिलची आयपीएलमधील अहमदाबादमधील कारगिरी उत्कृष्ट आहे. त्याने या मैदानावर आयपीएलमधील १२ सामन्यांच्या १२ डावांमध्ये ६६.९० च्या सरासरीने आणि १५९.२८ च्या स्ट्राईक रेटने ६६९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. येथे तो दोनदा नाबाद राहिला आहे. या मैदानावर शुभमनची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या १२९ आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी

आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर शुभमनला आतापर्यंत या मैदानावर एकही एकदिवसीय सामना खेळता आलेला नाही. त्याला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यास अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा तो पहिला एकदिवसीय सामना असेल.

मात्र, त्याने येथे टी-२० आणि कसोटी सामने खेळले आहेत. येथे ४ सामन्यांच्या ५ डावात ९३.३३ च्या सरासरीने २८० धावा केल्या आहेत. यामध्ये १२८ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. शुभमनने अहमदाबादमध्ये एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्याने एका डावात १२६ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट २०० होता.

 shubman gill
IND vs Pak Match: अहमदाबादमध्ये पाकिस्तानचा गेम होणार; बाबर आझमचं टेन्शन वाढणार, टीम इंडियासाठी गुड न्यूज

शुभमन गिलचा हा विक्रम पाहता शुभमनला इथे संधी मिळाल्यास तो पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवू शकतो. शुभमनने पाकिस्तानविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि हे दोन्ही सामने त्याने आशिया कप २०२३ मध्ये खेळले होते. दोन सामन्यात त्याने ६८ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com