IND vs PAK Asia Cup 2022 Live Score Saam TV
Sports

IND vs PAK Asia Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी, भारताचा निसटता पराभव

विराट कोहलीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पण....

नरेश शेंडे

भारत-पाकिस्तान यांच्यात आजचा सामना चुरशीचा झाला, पाकिस्तानचा भारतावर पाच गडी राखून विजय

आशिया करंडक स्पर्धा २०२२ मध्ये क्रिकेटचे रंगतदार सामने पाहायला मिळत आहे. आज रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा अटीतटीचा सामना झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत पाकिस्तान समोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र, पाकिस्तानचे आक्रमक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाझने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजयाची गवसणी घातली पण सामना अटीतटीचा असताना खूशदील शाह आणि आसिफ अलीने मोक्यावर चौके मारत भारताचा पराभव केला. भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगने आसिफ अलीचा झेल सोडल्याने पाकिस्तानचे विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या.

टीम इंडियाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहुलने आक्रमक फलंदाजी करत भारताला चांगली सुरुवात दिली. रोहित-राहुलने पाच षटकांत ५३ धावांची भागिदारी केली. पंरतु, पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौऊफने रोहित शर्माला २८ धावांवर बाद केले. त्यानंतर के एल राहुलही शादाब खानच्या गोलंदाजीवर २८ धावांवर माघारी परतला. मागील सामन्यात चमकदार कामगिरी केलेला सूर्यकुमार यादव आजच्या सामन्यात दमदार कामगिरी करु शकला नाही. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रिषभ पंतलाही धावांचा सूर गवसला नाही. रिव्हर्स स्वीफ मारण्याच्या इराद्यात पंथने विकेट गमावली. गेल्या सामन्यातील स्टार खेळाडू हार्दिक या सामन्यात मात्र निराशा केली. हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही.मोहम्मद हुसनैनने हार्दिकला शुन्यावर बाद केलं.

टीम इंडियाने २० षटकांत १८१ धावा केल्याने पाकिस्तानपुढं १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. विराटने आशिय कपमध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. दरम्यान, १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम मैदानात उतरले. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ९ धावा दिल्या. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने कर्णधार बाबर आझमला बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तर युझवेंद्र चहलने फखर जमानला 15 धावांवर बाद केलं. मोहम्मद रिझवान भारताविरोधात आक्रमक खेळी करत आहे. रिझवान अर्धशतकी खेळी करून मैदानावर धावांचा पाठलाग करत आहे. सोळाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने मोहम्मद नवाझला 42 धावांवर बाद केलं.

पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने १८१ धावांचा पाऊस पाडला, विराट चमकला

हारिस रौफच्या गोलंदाजीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला. रोहितने १६ चेंडूत २८ धावा केल्या. शादाब खानच्या गोलंदाजीवर के एल राहुल २८ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर मोहम्मद नवाझच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव १३ धावांवर बाद झाला. सतरा षटकानंतर भारताची धावसंख्या 164 - 5 अशी होती. भारताचा डावखुरा फलंदाज रिषभ पंत शादाब खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने खातंही उघडलं नाही. पंड्या शून्यावर बाद झाल्यानंतर दिपक हुड्डाला नसीन शाहने 16 धावांवर बाद केलं. मात्र, टीम इंडियाची रनमशीन विराट कोहलीने सुरुच ठेवली. ४४ चेंडू खेळत विराट ६० धावांवर रनआऊट झाला. टीम इंडियाने २० षटकांत १८१ धावा केल्याने पाकिस्तानपुढं १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. विराटने आशिय कपमध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. विराट फॉर्ममध्ये आल्याने क्रिकेटप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नऊ षटकानंतर भारताची धावसंख्या 91-3

हारिस रौफच्या गोलंदाजीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला. रोहितने १६ चेंडूत २८ धावा केल्या. शादाब खानच्या गोलंदाजीवर के एल राहुल २८ धावा करून झेलबाद झाला. नऊ षटकानंतर भारताची धावसंख्या 88-2 अशी आहे.

पॉवर प्ले संपला, सहा षटकांनतर भारताची धावसंख्या 62-2

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहाने पहिल्या षटकात ११ धावा दिल्या. त्यानंतर मोहम्मद हसनैनवरही भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि के एल राहुलने मोठे फटके मारले. मोहम्मदने दुसऱ्या षटकात ९ धावा दिल्या. तर तिसऱ्या षटकामध्ये नसीम शाहने १४ धावा दिल्या. हारिस रौफच्या गोलंदाजीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला. रोहितने १६ चेंडूत २८ धावा केल्या. शादाब खानच्या गोलंदाजीवर के एल राहुल २८ धावा करून झेलबाद झाला.

तीन षटकांनतर भारताची धावसंख्या 60-1

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहाने पहिल्या षटकात ११ धावा दिल्या. त्यानंतर मोहम्मद हसनैनवरही भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि के एल राहुलने मोठे फटके मारले. मोहम्मदने दुसऱ्या षटकात ९ धावा दिल्या. तर तिसऱ्या षटकामध्ये नसीम शाहने १४ धावा दिल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या बिनबाद ३४-० अशी झाली आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे. यासामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान यांच्यात थोड्याच वेळात रंगणार सामना  

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याचा थ्रीलर थोड्याच वेळात सुरु होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आजचा सामना कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Maharashtra Live News Update: तळोजा येथील अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग...

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

earthquake : महाराष्ट्रा शेजारील राज्य भूकंपाने हादरले, साखरझोपेत असताना जाणवले धक्के

SCROLL FOR NEXT