Team India Playing XI Asia Cup 2022/BCCI  SAAM TV
Sports

India vs Pakistan Playing XI: कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रवींद्र जडेजाची जागा कोण घेणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी महामुकाबला होणार आहे.

Nandkumar Joshi

India vs Pakistan Playing XI Asia Cup 2022 | मुंबई: आशिया कप २०२२ मध्ये रविवारी क्रिकेटचाहत्यांना मोठी मेजवानी मिळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटांतील प्रत्येकी दोन संघ सुपर ४ मध्ये पोहोचले आहेत. 'ग्रुप ए' मधून भारत आणि पाकिस्तान पोहोचले आहेत. त्यामुळे सुपर ४ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ पुन्हा भिडणार आहेत.

आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेच्या गट फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्या होत्या. भारताने अखेरच्या षटकात हे लक्ष्य गाठले होते.

भारताकडून विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्याने महत्वाच्या खेळी केल्या होत्या. मात्र, आता सर्व परिस्थिती बदलली आहे. दुखापत झाल्याने रवींद्र जडेजा आशिया कप स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निश्चित आहे.

रिषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात संधी मिळाली नव्हती. यावेळी पंतला नक्कीच संधी मिळेल, अशी शक्यता आहे. दिनेश कार्तिकवर संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे. दुसरीकडे टीम इंडिया (Team India) पाच गोलंदाजांसोबत उतरू शकत नाही. अशात एकाच वेळी पंत आणि कार्तिक संघात खेळू शकत नाहीत. रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेल किंवा दीपक हुडा यांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

संघात हार्दिकसोबतच एका अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता आहे. मात्र, दोघांपैकी कोण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाकिस्तानच्या बाबतीत सांगायचे झाले तर, त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

टीम इंडिया - संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/ दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, युजवेंद्र चहल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Sunil Shetty On Marathi Language: मला बोलायला भाग पाडू नका...; हिंदी-मराठी भाषा वादावर सुनील शेट्टीचं सडेतोड विधान

Iron Kadhai Benefits : लोखंडी कढईत जेवण बनवण्याचे 'हे' आहेत ५ फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT