ind vs pak hockey canva
Sports

Champions Trophy: भारत- पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही मिनिटात Sold Out! तिकिटांची किंमत किती?

India vs Pakistan Match Tickets: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकीट अवघ्या काही मिनिटात सोल्डआऊट झाली. दरम्यान तिकिटाची किंमत किती होती?

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. ही स्पर्धा आणखी जोरात होणार, कारण २०१७ नंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीदेखील भारताचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.

सर्वात चर्चेत असलेला आणि जगभरातील फॅन्स ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, असा भारत आणि पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला दुबईत रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी तिकीट विक्री सुरु झाली आणि अवघ्या काही मिनिटात तिकिटं सोल्डआऊट झाली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. या सामन्यासाठी तिकीट बुक करण्याची प्रोसेस गेल्या आठवड्यातच सुरु झाली होती.

तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची तिकिटं बुक करण्याची प्रोसेस ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५:३० वाजता सुरु झाली. या सामन्याची तिकीट अवघ्या काही मिनिटात सोल्डआऊट झाली.

किती होती तिकिटांची किंमत?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना २३ फेब्रुवारीला दुबईतील स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी केवळ भारत आणि पाकिस्तानातील नव्हे, तर जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या सामन्याच्या तिकिटाची किंमत १२५ दिरहम म्हणजे, भारतीय चलनानुसार २९६४ रुपये इतकी होती. तर प्रिमीयम लाँजची किंमत ५००० दिरहम म्हणजे, भारतीय चलनानुसार, १ लाख १८ हजार रुपये इतकी होती.

फॅन्सने व्यक्त केला संताप

प्रत्येक क्रिकेट फॅनला वाटतं की, एकदा तरी भारत- पाकिस्तान सामना स्टेडियममध्ये जाऊन लाईव्ह पाहावा. मात्र तिकीट मिळवण्यासाठी फॅन्सला ३ तास वाट पाहावी लागली. त्यानंतर तिकीट विक्रीला सुरुवात झाली. मात्र अवघ्या काही मिनिटात तिकीट सोल्ड आऊट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT