India vs Pakistan , Asia Cup 2023, Rohit Sharma, Babar Azam SAAM TV
क्रीडा

India vs Pakistan : वारे फिरले, भारत-पाकिस्तान सामना होणार रद्द? नेमकं काय आहे कारण?

Nandkumar Joshi

India vs Pakistan Asia Cup match : आशिया चषक स्पर्धेत क्रिकेट विश्वातले दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना होणार असला तरी अवघ्या जगाला त्याची उत्सुकता लागली आहे. पण क्रिकेटवेड्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची दाट शक्यता आहे. हा महामुकाबला रद्द होण्याची शक्यता ९० टक्के आहे, असा अंदाज आहे.

आशिया चषक स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचा धमाकेदार शुभारंभ पाकिस्ताननं विजयानं केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं तडाखेबंद शतक ठोकलं. पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं नेपाळवर २३८ धावांनी विजय मिळवला. (Latest sports updates)

आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा हा मोठा विजय मानला जातो. बाबर आणि इफ्तिखारच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात ३४२ धावांचा डोंगर उभारला. तुलनेत दुबळ्या संघाला फक्त १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. फिरकी गोलंदाज शादाब खानने ४ गडी गारद केले. आता पाकिस्तानची लढत गट फेरीत अखेरचा सामना २ सप्टेंबरला भारतासोबत होणार आहे. हा सामना दोघांसाठीही महत्वाचा आहे.

भारत आणि पाकिस्तानचा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कॅण्डी येथे होणार आहे. त्या दिवशी तिथं पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळं हा सामना रद्द होण्याची शक्यता ९० टक्के आहे. त्याचा थेट फायदा पाकिस्तान संघ आणि बाबरला होणार आहे.

वेदर डॉट कॉमनुसार, कॅण्डीमध्ये २ सप्टेंबरला केवळ मुसळधार पाऊसच नव्हे तर, वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. तसंच दिवसभर ढगाळ वातावरण राहील. पावसामुळं खेळपट्टी ओली झाल्यास ती लवकर सुकण्याची शक्यताही कमी आहे. श्रीलंकेत संपूर्ण मैदान झाकलं जातं असं अनेकदा बघायला मिळतं. पाऊस थांबला तर, पुन्हा सामना सुरू होतो.

आशिया चषक स्पर्धेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

असा असेल भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, तिलक वर्मा, इशान किशन, जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

पाकिस्तान संघात कोण?

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान, शऊद शकील, मोहम्मद वसिम, हारिस रउफ, आगा सलमान, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह और उस्मान मीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT