Rohit Sharma, Team India, Asia Cup 2023 SAAM TV
Sports

IND vs PAK, Asia Cup 2023: ..तर टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर पडणार! पाहा आजचा सामना रद्द झाल्यास कसं असेल समीकरण

India vs Pakistan Latest Updates: पाहा कसं असेल समीकरण

Ankush Dhavre

IND vs PAK, Asia Cup 2023:

आशिया चषकातील सुपर ४ चा सामना पाकिस्तान संघाविरूद्ध सुरु आहे. हा सामना रविवारी खेळवला जाणार होता. मात्र या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे आज खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाने पहिल्या दिवशी २४.१ षटकअखेर १४७ धावा केल्या होत्या. जर राखीव दिवशीही या सामन्याचा निकाल लागू शकला नाही,तर भारतीय संघाचं अंतिम फेरीत पोहोचणं कठीण आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यानंतर सुपर ४ चे इतर सामने आणि आशिया चषकाचा अंतिम सामना देखील याच मैदानावर रंगणार आहे.

क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी अशी की, येत्या आठवडाभर कोलंबोत पाऊस पडण्याची शक्यता ही ६० ते ८० टक्के इतकी असणार आहे. याचा अर्थ असा की, सुपर ४ फेरीतील इतर सामने देखील पावसामुळे धुतले जाऊ शकतात.

जर सुपर ४ फेरीतील इतर सामनेही रद्द झाले तर भारताचा संघ अंतिम फेरीत जाऊ शकणार नाही. कसं असेल समीकरण थोडक्यात समजून घ्या. (Latest sports updates)

सुपर ४ फेरीत एकुण ६ सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत २ सामने झाले आहेत. ज्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला आहे. तसं पाहायला गेलं तर बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत या तिन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. जर स्पर्धेतील पुढील सामने पावसामुळे रद्द झाले तर याचा फायदा पाकिस्तान आणि श्रीलंकेला होणार आहे.

कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत २-२ गुणांची कमाई केली आहे. जर सर्व सामने रद्द झाले तर भारतीय संघ जास्तीत जास्त ३ गुणांपर्यंत पोहचू शकतो. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ ४-४ गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT