India vs Pakistan In T20 World Cup 2026 saam tv
Sports

T20 World Cup : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? असं असू शकतं टी २० वर्ल्डकपचं समीकरण

India Vs Pakistan : टी २० वर्ल्डकप स्पर्धेचं सुपर ८ मधील चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील फेरीतील आठ संघ निश्चित झाले आहेत. पाकिस्ताननं नामिबियाला पराभूत करून सुपर ८ मधील स्थान पक्कं केलंय. भारताविरुद्ध सुपर ८ मधील प्रतिस्पर्धी संघ ठरले आहेत. सेमिफायनलमध्ये भारत-पाकिस्तान लढत बघायला मिळू शकते.

Nandkumar Joshi

नामिबियाविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवला आहे. कोलंबोत झालेल्या या सामन्यात पाकिस्ताननं नामिबियाला १०२ धावांनी पराभूत केलं. या विजयासह पाकिस्ताननं सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केलं आहे. पाकिस्तान हा सुपर ८ मध्ये पोहोचणारा आठवा म्हणजेच अखेरचा संघ ठरला आहे. पाकिस्तानच्या सुपर एन्ट्रीनं टी २० वर्ल्डकपमध्ये पुन्हा 'महामुकाबला' होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कदाचित सेमीफायलनमध्ये भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना बघायला मिळू शकतो.

पाकिस्तानचा दुबळ्या नामिबियाविरुद्ध मोठा विजय

कोलंबोतील मैदानावर पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी केली. नामिबियासमोर २०० धावांचं आव्हान ठेवलं. हे भलंमोठं आव्हान घेऊन उतरलेला नामिबिया संघ १०० धावाही करू शकला नाही. २०० धावांचं लक्ष्य गाठण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेला नामिबिया संघ ९७ धावांतच गुंडाळला. पाकिस्ताननं या अत्यंत महत्वाच्या सामन्यात विजय मिळवून सुपर ८ मध्ये दमदार एन्ट्री केली.

भारताविरुद्ध झिरो, नामिबियाविरुद्ध हिरो

नामिबियाला १०० धावांच्या आतच गुंडाळलं. यात पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारीकचा महत्वाचा वाटा होता. तारीक यानं ३.३ ओव्हरमध्ये १६ धावा देत ४ विकेट घेतल्या. तारीखच्या कारकिर्दीतील ही सर्वोच्च कामगिरी ठरली. शादाब खान यानं ४ ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, नामिबियावर साहिबजादा फरहान हा तुटून पडला होता. त्यानं ५८ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. त्याच्या विस्फोटक शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं १९९ धावांचा डोंगर उभा केला. नामिबियासमोर २०० धावांचं आव्हान ठेवलं.

सुपर ८ मधील संघ ठरले

पाकिस्तानचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. सुपर ८ मधील संघांची नावंही निश्चित झाली आहेत. एका गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ आहेत. तर दुसऱ्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे चार संघ आहेत.

सेमीफायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार?

सुपर ८ मध्ये प्रत्येक संघ आपापल्या गटातील इतर तीन संघांसोबत एकेक सामना खेळणार आहे. त्यामुळे सुपर ८ मध्ये भारत - पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. मात्र, सेमिफायनलमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर ग्रुप १ मधून भारत अव्वल स्थानी राहिला आणि ग्रुप २ मधून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला तर या दोन संघांमध्ये पुन्हा लढत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये दुष्काळाचे संकट बनले अधिकच तिव्र,विहीरींनी गाठला तळ

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

Weather Update : राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे थरार! मिसिंग लिंकवर २ भीषण अपघात; रस्त्यावर लागला केळींचा ढीग

SCROLL FOR NEXT