टीम इंडियाने वर्ल्डकप 2023 मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा बाजा वाजवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. सलग दोन विजयानंतर भारताने वर्ल्डकप विजयाचा आपला दावा आणखीच मजबूत केला. दरम्यान, आता टीम इंडियाचा तिसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. (Latest Marathi News)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (१४ ऑक्टोबर) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड देण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठी रणनीती आखली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा तीन फिरकी गोलंदाजांसोबत उतरण्याची शक्यता आहे.
त्यामागचं कारणंही तसंच आहे. पाकिस्तानचा संघ हा फिरकीविरोधात कमजोर समजला जातो. आशिया चषकात भारताच्या फिरकी (Team India) माऱ्यापुढे पाकच्या गोलंदाजांनी गुडघे टेकवले होते. कुलदीपच्या माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडाल्या होत्या. हीच गोष्ट टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हेरली आहे.
अहमदाबादची खेळपट्टी वळण घेणारी मानली जाते. आकडेवारीनुसार, आतापर्यंत या विश्वचषकाचे ज्या ज्या ठिकाणी सामने झाले आहेत, त्यापैकी सर्वाधिक वळण अहमदाबादच्या खेळपट्टीवर दिसून आले आहे. त्यामुळे या मैदानावर फिरकी गोलंदाजांविरोधात फलंदाजी करणे सोपं राहणार नाही.
पाकिस्तानकडे सुद्धा दोन फिरकी गोलंदाज आहे. मात्र, भारताकडे देखील फिरकीला खेळणारे चांगले फलंदाज आहेत. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी मजबूत मानली जाते. मात्र, मोटेरा खेळपट्टीवर अद्यापही वेगवान गोलंदाजांना फारसा स्विंग मिळालेला नाही.
धर्मशाला, दिल्ली आणि चेन्नईमध्ये स्विंग गोलंदाजांना अधिक मदत मिळाली आहे. अहमदाबादचे हे आकडे पाकिस्तानी छावणीला अडचणीत आणतील. एकीकडे खेळपट्टी फारशी मदत करणारी नाही आणि दुसरीकडे पाकिस्तान संघाच्या गोलंदाजीचे मुख्य अस्त्र शाहीन शाह आफ्रिदीला अद्याप आपली धार दाखवता आलेली नाही.
सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये आफ्रिदीचे चेंडू इनस्विंग होतात. आफ्रिदी हा फलंदाजांना पँडला टार्गेट करतो. रोहित शर्मा देखील इनस्विंग खेळताना अडचणीत सापडतो. मात्र, अहमदाबादच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत नसल्याने पाकिस्तान करणार तरी काय? हे येत्या शनिवारीच कळेल.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.